अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३५५ !

अकोल्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३५५ !
अकोला,दि.२२ : आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४४ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२१) आणखी  १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन जणांचा मृत्यू झाला,त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३५५ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आज अखेर एकूण ३३५५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३३३२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २९७७ अहवाल निगेटीव्ह तर ३५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २३ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ३३५५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१०७, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३३३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०८४ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २९४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३५५ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज १४ पॉझिटिव्ह
आज  दिवसभरात १५८अहवाल प्राप्त झाले. त्यात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर,  गोकुळ कॉलनी  येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून  ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.
तर आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या सहा अहवालात एक महिला व पाच पुरुषांचे अहवाल आहेत. यात जुने शहर, अकोट फैल,  गोकुळ कॉलनी जवाहर नगर,  मलकापूर अकोला, हमजा प्लॉट वाशिम बायपास व  मुजावरपुरा ता. पातूर येथील रहिवासी आहेत.
दोघे मयत
दरम्यान दोन रुग्ण मयत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे मंगळवार दि.१९ रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.
१५ जणांना डिस्चार्ज
तसेच काल (दि.२१) रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील १२ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे.  त्यात माळीपुरा येथील चार, रेल्वे कॉलनी येथील तीन,  लकडगंज येथील दोन, अकोट फैल येथील दोन, तर सिटी कोतवाली,  समता नगर, पूरपिडीत क्वार्टर, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत   जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २३ जण (एक आत्महत्या व २२ कोरोनामुळे) मयत आहेत. काल गुरुवार दि.२१ रोजी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २०६  झाली आहे. तर सद्यस्थितीत १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ३३१८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १९९८ गृहअलगीकरणात तर १३५ जण संस्थागत अलगीकरणात  असे २१३३ जण अलगीकरणात आहेत. तर १०४७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३८ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
......
विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
अकोला,दि.२२ अमरावती  विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्या अनुषंगाने करण्यात आलेले लॉकडाऊन, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज एका बैठकीत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अष्टपुत्रे,  डॉ. शिरसाम,  डॉ. अंबोरे,मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी  डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या, वाढते मृत्यू याबाबतची कारणे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उपलब्ध मनुष्यबळ व उपचार सुविधा यांचा आढावा घेतला. आवश्यकता भासल्यास अन्य जिल्ह्यातून वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी अनुमती  दर्शविली. त्यानंतर जिल्ह्यातील; विशेषतः शहरातील प्रतिबंधित क्षेत्र व त्यातील विविध सुविधा, त्या भागातील बाधितांची संख्या, पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्काची साखळी शोधणे याबाबत त्यांनी आढावा घेतला. नुकत्याच शिथील निर्बंध करण्यात आलेल्या भागांमधील स्थितीबाबतही त्यांनी माहिती घेतली.
......
नोंदणी होऊनही खरेदी न झालेल्या
शेतमालाची तपासणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
अकोला,दि.२२:  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे  शेतकऱ्यांना आपला शेतमाल जसे कापूस, तूर, हरभरा इ. खरेदीसाठी नोंदणी करुनही अद्याप खरेदी झालेला नाही. अशा शेतकऱ्याकडे पडून असलेल्या शेतमालाची तपासणी शासकीय कर्मचाऱ्यांनी करावी व अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना नोंदणी करुन अहवाल सादर करण्यासास्ठी आदेशीत केले आहे.
या संदर्भात गुरुवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते की, शेतकऱ्यांनी सीसीआय वा फेडरेशन या सारख्या संस्थांकडे माल विक्रीसाठी नोंदणी केली होती. तथापि अद्याप प्रत्यक्षात कापूस वा अन्य शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया होणे बाकी आहे. अशा मालाची  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था, उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक, कृषि मित्र इ. गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन त्यामार्फत तपासणी करुन  शिल्लक मालाचे छायाचित्र काढून ऑनलाईन नोंदीनुसार तपासणी करावी व वस्तुस्थितीचा अहवाल  जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था अकोला यांनी मंगळवार दि.२६ पर्यंत सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
......
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग विभागाची सेवा फक्त पॉझिटीव्ह मातांसाठी राखीव; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
अकोला,दि.२२  गर्भवती तसेच प्रसुती झालेल्या मातांचे कोरोना पॉझिटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. त्यामुळे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभागाची सेवा ही कोरोना पॉझिटीव्ह गरोदर मातांसाठी राखीव ठेवण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळ्कर यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार  जिल्हा स्त्री रुग्णालय वा अन्य खाजगी रुग्णालये यापैकी कोठेही संशयित गर्भवती  वा नुकतीच प्रसुती झालेल्या मातांची  नमुने घेतले असतील त्यांना त्याच रुग्णालयात अलगीकरण करुन ठेवावे. ज्या मातांचा अहवाल  पॉझिटीव्ह आल्यास त्यांना तात्काळ  जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील  स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभाग  येथे  कोरोना पॉझिटीव्ह उपचारांसाठी संदर्भित करावे, असे आदेशात म्हटले आहे.
....
खाजगी रुग्णालयातील रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास
तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे
अकोला,दि.२२-  कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  अनेक रुग्ण हे कोरोना संदर्भातील लक्षणे दिसल्यावर खाजगी रुग्णालयात जातात. तेथे या रुग्णांना कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्यांना  खाजगी डॉक्टर्सने  तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

अकोला जि.प.कृषि विभागामार्फत
कपाशी बी.टी१५८ अहवाल प्राप्तः १४ पॉझिटीव्ह, १५ डिस्चार्ज, दोन मयत
आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १५८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४४ अहवाल निगेटीव्ह तर १४ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. काल (दि.२१) आणखी  १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर दोन जणांचा मृत्यू झाला,त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या ३५५ झाली आहे.  तर आजअखेर प्रत्यक्षात १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ३३५५ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ३३३२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण २९७७ अहवाल निगेटीव्ह तर ३५५ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २३ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण ३३५५ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१०७, फेरतपासणीचे १०९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३३३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०८४ तर फेरतपासणीचे १०९ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १३९ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २९४४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ३५५ आहेत. तर आजअखेर २३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज १४ पॉझिटिव्ह
आज  दिवसभरात १५८अहवाल प्राप्त झाले. त्यात १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात तीन महिला व पाच पुरुष आहेत. यात दोघा मयत रुग्णांचाही समावेश आहे. उर्वरित रुग्णांपैकी दोघे फिरदौस कॉलनी तर अन्य हिरपूर ता. मुर्तिजापुर, भेंडगाव ता. बार्शिटाकळी, आंबेडकरनगर,  गोकुळ कॉलनी  येथील रहिवासी आहेत. पैकी भेंडगाव येथील महिला रुग्ण ही मुंबईहून आलेली असून  ती वर्धा येथील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आली होती. आल्यापासून ही महिला गावातील जि.प. शाळेतील अलगीकरण कक्षातच होती.
तर आज सायंकाळी पॉझिटीव्ह आलेल्या सहा अहवालात एक महिला व पाच पुरुषांचे अहवाल आहेत. यात जुने शहर, अकोट फैल,  गोकुळ कॉलनी जवाहर नगर,  मलकापूर अकोला, हमजा प्लॉट वाशिम बायपास व  मुजावरपुरा ता. पातूर येथील रहिवासी आहेत.
दोघे मयत
दरम्यान दोन रुग्ण मयत झाले आहेत. हे दोन्ही रुग्ण हे मंगळवार दि.१९ रोजी दाखल झाले होते. ते त्याच दिवशी मयत झाले. त्यांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. त्यातील एक रुग्ण ५० वर्षीय महिला असून ती नायगाव येथील रहिवासी आहे. तर अन्य एक ५२ वर्षीय पुरुष असून तो बाळापूर रोड अकोला येथील रहिवासी आहे.
१५ जणांना डिस्चार्ज
तसेच काल (दि.२१) रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यातील १२ जण कोवीड केअर सेंटरला निरीक्षणात आहेत. तर तिघांना घरी सोडण्यात आले आहे.  त्यात माळीपुरा येथील चार, रेल्वे कॉलनी येथील तीन,  लकडगंज येथील दोन, अकोट फैल येथील दोन, तर सिटी कोतवाली,  समता नगर, पूरपिडीत क्वार्टर, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
१२६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत   जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील २३ जण (एक आत्महत्या व २२ कोरोनामुळे) मयत आहेत. काल गुरुवार दि.२१ रोजी रात्री १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या २०६  झाली आहे. तर सद्यस्थितीत १२६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान आजअखेर ३३१८ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १९९८ गृहअलगीकरणात तर १३५ जण संस्थागत अलगीकरणात  असे २१३३ जण अलगीकरणात आहेत. तर १०४७ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर १३८ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.......
विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
अकोला,दि.२२ (जिमाकमम अमरावती  विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्या अनुषंगाने करण्यात आलेले लॉकडाऊन, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज एका बैठकीत आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, आरोग्य उपसंचालक डॉ. फारुखी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार,  मनपा आयुक्त संजय कापडणीस,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अष्टपुत्रे,  डॉ. शिरसाम,  डॉ. अंबोरे,मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी  डॉ. निलेश अपार तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त सिंह यांनी अकोला जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या, वाढते मृत्यू याबाबतची कारणे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उपलब्ध मनुष्यबळ व उपचार सुविधा यांचा आढावा घेतला. आवश्यकता भासल्यास अन्य जिल्ह्यातून वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी अनुमती  दर्शविली. त्यानंतर जिल्ह्यातील; विशेषतः शहरातील प्रतिबंधित क्षेत्र व त्यातील विविध सुविधा, त्या भागातील बाधितांची संख्या, पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या संपर्काची साखळी शोधणे याबाबत त्यांनी आढावा घेतला. नुकत्याच शिथील निर्बंध करण्यात आलेल्या भागांमधील स्थितीबाबतही त्यांनी माहिती घेतली.
०००००
नोंदणी होऊनही खरेदी न झालेल्या
शेतमालाची तपासणी करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
अकोला,दि.२२: कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे  शेतकऱ्यांना आपला शेतमाल जसे कापूस, तूर, हरभरा इ. खरेदीसाठी नोंदणी करुनही अद्याप खरेदी झालेला नाही. अशा शेतकऱ्याकडे पडून असलेल्या शेतमालाची तपासणी शासकीय कर्मचाऱ्यांनी करावी व अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना नोंदणी करुन अहवाल सादर करण्यासास्ठी आदेशीत केले आहे.
या संदर्भात गुरुवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते की, शेतकऱ्यांनी सीसीआय वा फेडरेशन या सारख्या संस्थांकडे माल विक्रीसाठी नोंदणी केली होती. तथापि अद्याप प्रत्यक्षात कापूस वा अन्य शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया होणे बाकी आहे. अशा मालाची  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था, उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक, कृषि मित्र इ. गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन त्यामार्फत तपासणी करुन  शिल्लक मालाचे छायाचित्र काढून ऑनलाईन नोंदीनुसार तपासणी करावी व वस्तुस्थितीचा अहवाल  जिल्हा उपनिबंधक  सहकारी संस्था अकोला यांनी मंगळवार दि.२६ पर्यंत सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे.
०००००
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग विभागाची सेवा फक्त पॉझिटीव्ह मातांसाठी राखीव; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोला,दि.२  गर्भवती तसेच प्रसुती झालेल्या मातांचे कोरोना पॉझिटीव्ह अहवाल येण्याचे प्रमाण अलिकडे वाढत आहे. त्यामुळे  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभागाची सेवा ही कोरोना पॉझिटीव्ह गरोदर मातांसाठी राखीव ठेवण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळ्कर यांनी आज निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार  जिल्हा स्त्री रुग्णालय वा अन्य खाजगी रुग्णालये यापैकी कोठेही संशयित गर्भवती  वा नुकतीच प्रसुती झालेल्या मातांची  नमुने घेतले असतील त्यांना त्याच रुग्णालयात अलगीकरण करुन ठेवावे. ज्या मातांचा अहवाल  पॉझिटीव्ह आल्यास त्यांना तात्काळ  जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील  स्त्री रोग व प्रसुतीशा
खाजगी रुग्णालयातील रुग्णांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवावे
अकोला,दि.२२   कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर  अनेक रुग्ण हे कोरोना संदर्भातील लक्षणे दिसल्यावर खाजगी रुग्णालयात जातात. तेथे या रुग्णांना कोरोनाचे लक्षणे आढळल्यास त्यांना  खाजगी डॉक्टर्सने  तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करावे, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
.....
अकोला जि.प.कृषि विभागामार्फत
कपाशी बी.टी बियाण्यांवर अनुदान योजनेस प्रशासकीय मान्यता
  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर शेतकऱ्याला सन २०२०-२१ खरीप हंगामात अल्पभुधारक सर्वसाधारण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-२ बियाणे लागवडीसाठी ९० % अनुदान योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देवुन त्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई भोजने आणि कृषि व पशुसवंर्धन सभापती पंजाबरावजी वडाळ यांच्या पुढाकाराने सन २०२०-२१ खरीप हंगामात अल्पभुधारक सर्वसाधरण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-२ बियाणे लागवडीसाठी ९० % अनुदान योजनेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही योजना अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी असुन प्रति लाभार्थी कमाल एक एकरासाठी कपाशी बियाणे दोन पाकीट याप्रमाणे मर्यादीत राहील. यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२, ८ अ चा उतारा, आधारकार्ड सलंग्न बँक खाते पुस्तिकेच्या पहील्या पानाची सत्यप्रत , अपंग असल्यास तसे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत ग्रामसेवक ग्राम पंचायत मार्फत पंचायत समितीला सादर करावे. पंचायत समिती स्तरावर छाननी करुन पात्र लाभार्थ्यांच्या यादीतुन कृषि समिती जिल्हा परिषद अकोला दवारे लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी अधिकृत परवानाधारक निविष्ट विक्रेत्यांकडुन संकरीत कपाशी बी.टी. बियाणे बी.जी.II खरेदी करुन विहीत खरेदी पावती कृषि विभागाकडे सादर केल्यानंतर ९० % अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) दवारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पेरणीनंतर कपाशी क्षेत्राची तपासणी करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दि.५ जून पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, कृषि व पशुसवंर्धन समिती पंजाबरावजी वडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, कृषि विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे यांनी केले आहे
.
बियाण्यांवर अनुदान योजनेस प्रशासकीय मान्यता
  कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर शेतकऱ्याला सन २०२०-२१ खरीप हंगामात अल्पभुधारक सर्वसाधारण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-२ बियाणे लागवडीसाठी ९० % अनुदान योजनेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी केले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याला आर्थिक पाठबळ देवुन त्याचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई भोजने आणि कृषि व पशुसवंर्धन सभापती पंजाबरावजी वडाळ यांच्या पुढाकाराने सन २०२०-२१ खरीप हंगामात अल्पभुधारक सर्वसाधरण शेतकऱ्यांना कपाशी बी.जी.-२ बियाणे लागवडीसाठी ९० % अनुदान योजनेस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही योजना अकोला जिल्ह्यातील सर्वसाधारण अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी असुन प्रति लाभार्थी कमाल एक एकरासाठी कपाशी बियाणे दोन पाकीट याप्रमाणे मर्यादीत राहील. यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२, ८ अ चा उतारा, आधारकार्ड सलंग्न बँक खाते पुस्तिकेच्या पहील्या पानाची सत्यप्रत , अपंग असल्यास तसे अधिकृत प्रमाणपत्र अर्जासोबत ग्रामसेवक ग्राम पंचायत मार्फत पंचायत समितीला सादर करावे. पंचायत समिती स्तरावर छाननी करुन पात्र लाभार्थ्यांच्या यादीतुन कृषि समिती जिल्हा परिषद अकोला दवारे लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी अधिकृत परवानाधारक निविष्ट विक्रेत्यांकडुन संकरीत कपाशी बी.टी. बियाणे बी.जी.II खरेदी करुन विहीत खरेदी पावती कृषि विभागाकडे सादर केल्यानंतर ९० % अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डिबीटी) दवारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. पेरणीनंतर कपाशी क्षेत्राची तपासणी करण्यात येईल. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दि.५ जून पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, कृषि व पशुसवंर्धन समिती पंजाबरावजी वडाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, कृषि विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे यांनी केले आहे.
......

टिप्पण्या