पहिल्या 'चेंज द लाईफ विचारपीठ संमेलन' अध्यक्षपदी अशोक शिरसाट

पहिल्या 'चेंज द लाईफ विचारपीठ संमेलन' अध्यक्षपदी अशोक शिरसाट

सप्टेबर महिन्यात पुणे येथे होणार विचार मंथन

अकोला: संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुणे येथे सप्टेंबर महिन्यात पहिलेच 'चेंज द लाईफ राष्ट्रीय त्रैभाषिक विद्यार्थी, पालक, पदवीधर व शिक्षक विचारपीठ संमेलन' आयोजित केले असून, या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द साहित्यिक अशोक वि. शिरसाट यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष आतिश सोसे, कार्याध्यक्ष  संदीप फासे व उपाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे.
या विचारपीठ संमेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून, अनेकविध विषयांवर या संमेलनामध्ये झालेल्या विचारमंथनातील सर्वसमावेशक मुद्द्यांना शासन दरबारी पोहचवून त्याचा पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत. संमेलनाध्यक्ष अशोक शिरसाट हे मूळचे अकोल्याचे (देगाव). त्यांनी समाजशास्त्र व मराठी या दोन विषयांमध्ये एम.ए.केले असून लाईनमन, सीटीआय केले आहे. ते सध्या आयटीआय पनवेल येथे वीजतंत्री या विषयांचे अध्यापन करीत आहेत. मागील तीन दशकांहूनही अधिक काळापासून ते साहित्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात सातत्याने लेखन व प्रभावी कार्य करीत असून, आजवर त्यांची उधाण, माणुसकीच्या दुबार पेरणीसाठी, हरवलेल्या सावल्या ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या कवितासंग्रहाच्या व्दितीय आवृत्याही प्रकाशित झाल्या आहेत. त्यांची काही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर असून लवकरच 'निवडक अशोक शिरसाट' नावाने त्यांच्या एकूणच साहित्य आणि आजवरच्या सर्व वाटचालीचा आढावा घेऊन हा संपादित ग्रंथाचेही काम सुरु आहे.  त्यांनी ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये कविकट्टा कार्यक्रमाचे परीक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. पनवेल येथे अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या आठव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल, कुमार,युवा व नवोदित साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पदासह उत्कृष्ट संमेलनाध्यक्ष पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. 'बाबांच्या कविता' या मान्यवरांच्या कविता असलेल्या संग्रहात त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचे उधाण हे पुस्तक शासनमान्य ग्रंथ यादीत समाविष्ठ करण्यात आले आहे. त्यांनी काही स्मरणिकेचेही संपादन केले आहे. अकोला व सांगली आकाशवाणी केंद्रासह काही मराठी वाहिन्यांनीही त्यांच्या साहित्याची दखल घेतली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. 

शब्दशिवार ' च्या संपादकीय मंडळावर    
                                                        सप्तर्षी प्रकाशन, मंगळवेढा जि.सोलापूर यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  'शब्दशिवार ' हा वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक / २०२० प्रकाशित होणार आहे.कथा , कविता , चुटकुले , ललित , चारोळ्या , प्रवासवर्णन , विनोदी लेखन , चालू घडामोडीवर लेख आदि साहित्य आमंत्रित आहे. डॉ श्रीकांत पाटील कोल्हापूर , अड. कुमुदिनी घुले यांनी अशोक शिरसाट यांची 'शब्दशिवार ' च्या संपादकीय मंडळावर नियुक्ती केल्या बद्दल शिरसाट यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या