- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लाॅकडाऊन काळातही भारतीय जैन संघटनेची जलसंधारणाची कामे सुरू
पालकमंत्री जल शोषक चर निर्मित पाणंद रस्ते कामाचाही सहभाग.
ग्रामपंचायत स्तरावर लोक सहभागातून होत आहेत मोठ्या प्रमाणात कामे.
अकोला : भारतीय जैन संघटनेच्या वतीने लाॅकडाऊन काळातही सर्व नियमांचे पालन करुन अकोला जिल्ह्यात जलसंधारणाची कामे धडाक्याने सुरू आहेत अशी माहिती प्रकल्प प्रमुख प्रा.सुभाष गादिया यांनी दिली आहे. सुजलाम् सुफलाम् अकोला प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय जैन संघटने मार्फत ग्राम पंचायत स्तरावर विविध जलसंधारणाची कामे करण्याकरिता ग्राम पंचायत जल संधारण मॉडेल अंतर्गत 37 जेसीबी मशीन गावकऱ्यांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

या माध्यमातून जिल्ह्यातील जवळपास 30 ग्राम पंचायत मध्ये शेततळे, नाला खोलीकरण, जल शोषक कम पाणंद रस्ते, तलावातील गाळ काढणे अशी विविध जल संधारणाची कामे सुरू आहेत. उपसलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात नेऊन टाकत आहेत.
अकोला जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३१ हजार ३७५ घनमीटर गाळ आणि मातीचा उपसा करण्यात आला असून २३ कोटी १३ लाख लिटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे.
अकोलातालुक्यातील टाकळी पोटे, निपाना, उगवा, कापशी, वनी रंभापुर, ढगा, मासासिसा, कापशी, कौलखेड गोमाशे, कौलखेड जहागीर या गावांमध्ये काम सुरू असून बार्शीटाकळी तालुक्यात गोरव्हा, धाकली, मोझरी, सराव येथे कामे सुरू आहेत.तसेच तेल्हारा तालुक्यात वरुड वाडणेर, कोठा वडगाव रोठे, माळेगांव ,राणेगाव ,वाकोडी येथे कामे सुरू आहेत. तर मुर्तिजापूर तालुक्यात खापरावाडा , माना, मधापुरी, जितापूर(खेडकर), कंझरा येथे कामे सुरू आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी आणि नोडल अधिकारी बाळासाहेब गाढवे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पं.स. बिडीओ, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांचे सहकार्य या कामात मिळत आहे. जलसंधारणाच्या कामासाठी शेतकऱ्यांची मशिनला मोठी मागणी आहे. या प्रकल्पाचे यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य यांचे सह तालुका समन्वयक पंकज वाडेवाले, अंकुश परांजळे, आकाश गायगोले तसेच मशिन आपरेटर अथक परिश्रम घेत आहेत.
.........
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा