Animals and birds: वाढत्या तापमानात पशु - पक्ष्यांची घ्या काळजी!

वाढत्या तापमानात पशु - पक्ष्यांची घ्या काळजी!

अकोला: वाढत्या उन्हामुळे अंगाची काहिली होत असल्याने फक्त माणसेच हवालदिल होत नसून याचा फटका पशु पक्ष्यांनाही बसत आहे. सध्या अकोला चे तापमान ४४ते ४७ अंश होत आहे.  मात्र, याचे पक्ष्यांच्या जीवनमानावर गंभीर परिणाम होत असून वेळीच पाणी न मिळाल्याने अनेक पक्षी मृत्युमुखी पडत आहेत.

दरवर्षी एप्रिल महिन्यापासून उन्हाळी झळा वाढू लागल्या की पशुपक्षी आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, उन्हाळा सुरू झाल्यावर सामान्य माणसापासून प्राण्यापर्यंत सगळ्यांनाच चटके बसू लागल्याने प्रत्येक जण पाणी अथवा थंडाव्याच्या शोधात असतो. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे माणसाच्या या गरजा तात्काळ पूर्ण होतात. मात्र, प्राणी व पक्षी यांना नैसर्गिक स्रोतांमधूनच या गरजा भागवाव्या लागत असल्याने त्यांच्यापुढे अडचणी निर्माण होतात.

यात उन्हाचा जास्त फटका पक्ष्यांना बसत असल्याने त्यांच्या शरीरातील पाणी कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे उडताना अचानक खाली पडणे, तारांमध्ये अडकणे अथवा मृत्यू होणे असे गंभीर प्रकार पक्ष्यांबाबत घडतात. पक्षी संशोधक श्री लक्ष्मीशंकर यादव अकोला यांनी याबाबत सांगताना माहिती दिली, शहरातील हिरवळ व पाण्याचे स्रोत कमी होत असून त्याचा पक्ष्यांच्या घरटय़ांवर परिणाम होत आहे. तसेच नागरिक त्यांच्या घरात अथवा इमारतीत होणारी पक्ष्यांची घरटी काढून टाकतात, त्यामुळे आधीच झाडावर घरटे करू न शकल्याने हे पक्षी बाहेर येतात व निवाऱ्याचा पर्याय न मिळाल्याने उन्हाला बळी पडतात.उन्हाळ्यात कबुतरे,  घुबड,  कोकिळा उपचारांसाठी येतात. यात घारींची संख्या सर्वाधिक आहे.

पक्ष्यांसाठी काय कराल

घर अथवा इमारतीवर पाण्याची भांडी ठेवण्यात यावीत. यामुळे पक्ष्यांना आधार मिळू शकेल. ही पाण्याची भांडी सावलीत ठेवावीत तसेच त्यातील पाणी काही काळाने बदलणे आवश्यक आहे. तसेच या काळात इमारतींमधील पक्ष्यांची घरटी तोडू नका व शक्य झाल्यास कृत्रिम घरटी घराच्या परिसरात बसवा.वाढत्या तापमान मुळे जख्मी किंवा बेशुध्द अवस्थे मध्ये दिसला तर कृपया मार्गदर्शन व मदत साठी पक्षी संशोधक  लक्ष्मीशंकर यादव, वाशिम रोड, भगीरथवाडी येथे संपर्क साधावा.

Take care of animals - birds in rising temperatures!

टिप्पण्या