Agriculture news:डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे राज्यस्तरीय कापूस वेबिनारचे आयोजन

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे राज्यस्तरीय कापूस वेबिनारचे आयोजन 
अकोला:covid-19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम येऊ घातला आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता विदर्भ, मराठवाडा,आणि उत्तर महाराष्ट्राच्या ,बहुतांशी भागात  कापूस पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या अतिशय महत्त्वाच्या नगदी पिकाच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालया द्वारे *"राज्यस्तरीय ऑनलाईन कापूस कार्यशाळेचे"* आयोजन मंगळवार दिनांक 26 मे 2020 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय नामदार श्री दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते सदर कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न होणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  मा. डॉ. विलास भाले यांचे अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेसाठी  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी चे कुलगुरू डॉ. के पी विश्वनाथा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी चे कुलगुरू डॉ.अशोक ढवण, महाराष्ट्र राज्याचे आयुक्त कृषी .डॉ. सुहास दिवसे तथा अटारी पुणेचे संचालक डॉ.लाखनसिंग प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. डॉ.दिलीप मानकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पं दे कृ वि, अकोला, डॉ.प्रदीप इंगोले,अधिष्ठाता कृषी डॉ. पं दे कृ वि, अकोला, डॉ. विलास खर्चे संचालक संशोधन,डॉ. पं दे कृ वि, अकोला, डॉ. शरद गडाख, संचालक विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मा. डॉ, देवराव देवसरकर, संचालक विस्तार शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी तथा अमरावती विभागीय कृषी सहसंचालक  सुभाष नागरे यांचे उपस्थितीत संपन्न होणाऱ्या अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यशाळेत संपूर्ण राज्यातून कापूस विषयाचे तज्ञ प्रगतिशील शेतकरी कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून ऑनलाइन पद्धतीने सहभागी होण्यासाठी शेतकरी बंधू-भगिनींना एक लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून त्यावर ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे.  उपरोक्त नोंदणी केल्यानंतर आपल्या इमेलवर लिंक प्राप्त होईल ज्याद्वारे आपल्याला कार्यशाळेत सहभागी होता येईल. या कार्यशाळेसाठी राज्यातील सर्व कृषी विद्यापीठातील अधिकारी शास्त्रज्ञ विभाग प्रमुख सर्व कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक विषयतज्ञ कृषी विभागाचे सर्व संचालक राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कर्मचारी तसेच कापूस उत्पादक बंधू-भगिनींनी आमंत्रित करण्यात येत असून मोठ्या संख्येने ऑनलाईन सहभागी होऊन यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्याची मुहूर्तमेढ रोवावी असे आवाहन आयोजक डॉ. दिलीप मानकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. पं दे कृ वि, अकोला, यांनी केले आहे.
.........

टिप्पण्या