Rishi Kapoor:खुल्लम खुल्ल्ला' जगणारे ऋषी कपूर यांनी जगाला केलं अलविदा!

'खुल्लम खुल्ल्ला' जगणारे ऋषी कपूर यांनी जगाला केलं अलविदा!

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता इरफान खान चाहत्यांना काल सोडून  गेला. तर आज सकाळी उठल्या बरोबर बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी कळली. खुल्लम खुल्ला जगणारे ऋषी कपूर यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने  मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला.  इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अवघे बॉलिवूड शोकमग्न झाले आहे. चाहतेही शोकाकूल आहेत.

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी मुंबईत झाला. आज गुरुवारी  ३० एप्रिल २०२० रोजी अखेरचा श्वास देखील मुंबईतच घेतला. ऋषी कपूर भारतीय सिने सृष्टीला मिळालेले उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक होते. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी यांनी १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या होत्या. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेत. पत्‍नी नीतू सिंग सोबत  त्यांची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. १९९० आणि २००० च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकांच्या स्वरूपात बदल केला. 'कुछ तो है' या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवून ठेवतो तर अग्निपथ(नविन) मधला रौफ लाला हा प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करतो. औरंगजेब सिनेमातील त्यांची भूमिका अत्यन्त निर्दयी वाटते. प्रेक्षकांना असे वाटणे, हीच कसलेल्या कलाकारांना आपल्या अभिनयाची पावती असते.मोठे पुरस्कारही त्यासमोर गौण असतात.

बॉलीवूडला सशक्त करणाऱ्या कपूर घराण्याचे ते वारस होते. शो मॅन राज कपूर यांचे ते पुत्र होते. चिंटू या नावाने त्यांची सिने जगतात ओळख होती.पत्नी नीतू सिंग या देखील दिग्गज अभिनेत्री आहेत.ऋषी कपूर आणि नितु सिंग यांची ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडी हिट ठरली. ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर नव्या पिढीचे नेतृत्व चंदेरी दुनियेत करीत आहे. १९७० ते २०१६ पर्यंत त्यांनी हिंदी सिनेसृष्टीची सेवा केली. आपल्या जीवनातील चढ उतार, सुख दुःख,सोनेरी क्षण असे सार काही ऋषी कपूरने ‘खुल्लम खुल्ला’ या नावाचे आत्मचरित्र लिहुन उजागर केले. हे आत्मचरित्र म्हणजे ऋषी कपूर जणू काही आपल्याशी संवादच साधत आहे, असे वाचताना भास होतो.

ऋषी कपूरची यांनी जवळपास  १२० हिन्दी चित्रपटात भूमिका रंगविल्या. दिग्दर्शक म्हणूनही यशस्वी कामगिरी त्यांनी केली.२०१६  मध्ये प्रदर्शित सनम रे हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. मेरा नाम जोकर चित्रपटात त्यांनी नायकाचे बालपण रंगविले होते.पुढे बॉबी चित्रपटात नायकाची भूमिका त्यांनी केली. या चित्रपटातून सिने सृष्टीला चॉकलेट हिरो मिळाला. ऑल  इज वेल,वेडिंग पुलाव, बेवकूफीयां,डी-डे, हाऊसफुल 2,पटियाला हाऊस,दिल्ली-६, स्टुडन्ट ऑफ द इअर,लक बाय चान्स, हल्ला बोल,थोडा प्यार थोडा मॅजिक ,डोन्ट स्टॉप ड्रीमिंग,नमस्ते लंडन,ओम शांति ओम,लव के चक्कर में,    ,फ़ना,प्यार में ट्विस्ट, हमतुम,तहज़ीब,कुछ तो है, लव एट टाइम्स स्क्वैर,ये है जलवा,कुछ खट्टी कुछ मीठी,राजू चाचा,कारोबार,जय हिन्द, कौन सच्चा कौन झूठा,प्रेम ग्रंथ,दरार,हम दोनों,साजन की बाहों मे, सागर,याराना,ईना मीना डीका,साजन का घर,प्रेमरोग, पहला पहला प्यार, मोहब्बत की आरज़ू, घर की इज्जत,गुरुदेव,इज़्ज़त की रोटी,    श्रीमान आशिक,साहिबॉं,साधना,दामिनी,दीवाना    ,बोल राधा बोल,हनीमून,इन्तेहा प्यार की,बंजारन, हिना, घर परिवार, अज़ूबा,रणभूमि,अमीरी गरीबी, शेषनाग,आज़ाद देश के गुलाम,खोज,चॉंदनी, बड़े घर की बेटी,हथियार,घराना,हमारा खानदान,घर घर की कहानी,प्यार के काबिल,    हवालात,    सिंदूर, खुदगर्ज़,    नगीना, एक चादर मैली सी,नसीब अपना अपना,दोस्ती दुश्मनी, राही बदल गये, तवायफ़, सागर, ज़माना, सितमगर, ये इश्क नहीं आसांन,    दुनिया,कुली,दीदार-ए-यार,ये वादा रहा    ,प्रेम रोग, जमाने को दिखाना है, नसीब    ,कर्ज़,दो प्रेमी, आप के दीवाने    ,धन दौलत,सरगम,    सलाम मेमसाब,    झूठा कहीं का,फूल खिले हैं गुलशन गुलशन,    बदलते रिश्ते,पति पत्‍नी और वो, नया दौर, दूसरा आदमी,    अमर अकबर एन्थोनी,चला मुरारी हीरो बनने, रंगीला रतन,    लैला मज़नू,बारूद    ,कभी कभी, रफ़ू चक्कर, बॉबी,यादों की बारात,मेरा नाम जोकर आदी चित्रपट ऋषी कपूर यांच्या अभिनयाने अजरामर झाले. बॉबी,कर्ज,सरगम,प्रेमरोग,लैला मजनू, रफ्फुचक्कर, दामिनी,सागर,दिवाना, बोल राधा बोल, हिना, अमर अकबर अंथॉनी,चांदनी ही अशी मोठी चित्रपटाची यादी.हे चित्रपट चाहते कधीच विसरू शकत नाही.नवी पिढी सुद्धा ऋषी कपूरचे चित्रपट आवडीने बघतात.   

  ऋषी कपूर यांच्यासाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक गायकांनी गाणी म्हटली. आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. आजही सर्व म्युझिक चॅनेल्स आणि नभोवाणी,आकाशवाणी चॅनेल्सवर ऋषी कपूर यांच्या चित्रपट मधील गाणी चाहते आवडीने पाहतात आणि ऐकतात. १९८०-९०च्या दशकात ऋषी कापूर यांचे चित्रपट घरोघरी व्हीसीआर लावून पाहली जात असे.भाडे देऊन व्हीसीआर आणल्या जात असल्याने एकाच दिवशी पाच ते सहा चित्रपट बघितल्या जायचे.  नितुसिंग,जयाप्रदा,श्रीदेवी,जुही चावला,माधुरी दीक्षित,दिव्या भारती, झेबा बख्ततीयार, पद्मिनी कोल्हापुरे, मीनाक्षी शेषान्द्री आदी अभिनेत्री सोबत त्यांची ऑनस्क्रीन जोडी हिट ठरली होती.अशा या एव्हरग्रीन चॉकलेट हिरोला भावपूर्ण आदरांजली.


                            लेखक

          अधिवक्ता नीलिमा शिंगणे-जगड

                     अकोला(विदर्भ प्रांत)


टिप्पण्या