अकोल्यात दोन तास चालले भीषण अग्नितांडव!

अकोल्यात दोन तास चालले भीषण  अग्नितांडव!

         दाणा बाजारात भीषण आग

अकोला दि २१: शहरातील दाणा बाजार येथे मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.यामध्ये ८ किराणा व धान्याचे दुकान आणि १ गोदाम जळून खाक झाले. आगीची झळ जवळपास २० दुकानांना लागली. अकोला अग्निशमन दल,पोलीस विभाग,मनपा कर्मचारी यांनी वेळेचे गांभीर्य ओळखून आग आटोक्यात आणून,पुढील अनर्थ टाळला.  आगीने रौद्ररूप धारण केले होते.सुमारे दोन तास आगीचे तांडव सुरू होते. अग्निशमन दलच्या चार  गाड्या घटनास्थळी लगेच पोहचल्या होत्या. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळी उपस्थितांनी  व्यक्त केला.

आगीचे कारण शोधण्यात यावे-आमदार शर्मा

अकोला दाणाबाजार येथे आज पहाटे सहा वाजता भीषण आग लागून १४ ते २० दुकाने जळून खाक झाले आहे. या घटनेची चौकशी करून आगीचे कारणाचा शोध घेण्यात यावा.तसेच अग्नीग्रस्त व्यापाऱ्यांना त्वरित शासनाने मदत द्यावी. त्यांचे पंचनामे करण्यात यावे ,अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे. 

आमदार गोवर्धन शर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

आज सकाळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली व पोलिस अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच अग्नि ग्रस्त व्यापारी व व्यापारी संघटनेशी चर्चा केली. पोलिस बंदोबस्त असताना या भागांमध्ये कोणीही येत नसतांना हा प्रकार कसा घडला. आगीचे कारण शोध घेण्यात यावे, अशी मागणी आमदार शर्मा यांनी केली.  पंचनामे करून अन्न धान्याची सध्या गरज असताना बाजारात आग लागल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे यासंदर्भात पोलीस विभागाने चौकशी करावी, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी करून तात्काळ व्यापाऱ्यांना मदत घ्यावी. अनेक व्यापाऱ्यांची विमा नसल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्ननिर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित त्यांना आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून व्यापाऱ्यांचे पंचनामे करून नुकसानीची भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चनाताई मसने यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली.

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांची भेट

गांधी रोड परिसरातील दाणा बाजारात लागलेल्या आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून व्यापारी व व्यावसायिकांचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी सांत्वन केले.

वंचित बहुजन आघाडीच्या  जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते डॉ धैर्यवर्धन पुंडकर  व ज्येष्ठ नेते मनोहर पंजवानी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी केली.  वंचीत बहुजन आघाडी नुकसानग्रस्त व्यापारी बंधूंच्या मागे सर्व ताकतीने उभा आहे, असे आश्वाशीत केले.

…...


टिप्पण्या