अकोल्यात आणखी ७ कोरोना बाधित रुग्ण

अकोल्यात आणखी ७ कोरोना बाधित रुग्ण

https://youtu.be/yeqpabJPTp4

अकोला: शहरात बुधवार पर्यंत २ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. गुरुवारी सकाळी आणखी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिकृत सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार नवीन सातही कोरोना बाधित रुग्ण हे पातूर तालुक्यातील आहे.

कोरोना संसर्गग्रस्तांचे अद्यावत अहवाल

अकोला जिल्ह्यात एकूण तपासलेले नमुने- १४८

अहवाल प्राप्त संख्या-१०९

पॉझिटिव्ह -९

निगेटिव्ह-१००


पातूर मधील सात अहवाल पॉझिटिव्ह

आज सकाळी प्राप्त अहवालानुसार पातूर येथील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे सर्वजण वाशीम येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले होते.आता अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.


शिर्ला येथील दोन रुग्ण

पातूर तालुक्यातील  सात रुग्णांमध्ये शिर्ला येथील दोन रुग्णाचा समावेश असल्याचे कळते. शिर्ला गाव सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. पातूर आणि शिर्ला हद्दितील सात बाधित रुग्णापैकी पैकी पाच जणांच्या कुटुंबाला अकोला येथे हलविण्यात येत आहे.१०८रुग्णवाहिका गावात दाखल झाली आहे.


अमरावती येथून पातुरात दाखल

धार्मिक कार्यक्रमातून अमरावती येथुन पातुरात दाखल झालेले दोन वाहन चालकासह १५ जण प्रशासनाच्या संपर्कात नव्हते. प्रशासनाला माहिती मिळाल्या नंतर  रुग्णांना अकोल्यात दाखल करण्यात आले होते.यासर्वांच्या कुटुंबातील सदस्य संख्या ५६ हुन अधिक आहे.पातुरातील सोळा पैकी सात पॉझिटिव्ह, सहा निगेटिव्ह तर तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत.

टिप्पण्या