- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लॉकडाऊन कालावधीत १७६३ वाहनांना परवानगी
अकोला,दि.२५: कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायांचा भाग म्हणून लॉक डाऊन करण्यात आले. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अनुषंगिक बाबींचा पुरवठा करण्यासाठी माल वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी जिल्ह्यात आजअखेर १७६३ वाहनांना परवानगी (पासेस) देण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात आज अखेर अकोला जिल्ह्याअंतर्गत वाहतुकीसाठी ५३९ वाहनांना परवानगी देण्यात आली. तर जिल्ह्याबाहेर पण राज्याअंतर्गत वाहतुकीसाठी १०६६ पासेस देण्यात आले तर अन्य राज्यात जाण्यासाठी १५८ पासेस देण्यात आले, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात आली आहे. शेतमाल, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, वैद्यकीय वस्तू व औषधे यांची वाहतूक करण्यासाठी किंवा ज्या ज्या वस्तू व सेवांना लॉक डाऊन मधून वगळण्यात आले आहे, त्यांना हे पासेस दिले जातात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा