अकोल्यात पॉझिटीव्ह रुग्ण संख्या दोन

अकोल्यात पॉझिटीव्ह रुग्ण संख्या दोन

३६१ अहवालांपैकी ३४६ निगेटिव्ह

ग्रामीण भागात २० हजार जणांची तपासणी

अकोला,दि.१८: जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे. आज प्राप्त ५५ अहवालांनुसार एक रुग्ण पॉझिटीव्ह तर अन्य संशयित रुग्ण निगेटीव्ह असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यानुसार,आता जिल्ह्यात कोविड बाधीत १५ रुग्ण असून त्यातील दोघे मयत आहेत. तर अन्य १३ पैकी फेरतपासणीत  ११ जण निगेटीव्ह असून फेरतपासणीतील एक तर नव्याने तपासणी झालेला एक असे दोघे रुग्ण पॉझिटीव्ह आहेत. दरम्यान आज पॉझिटीव्ह अहवाल आलेली रुग्ण ही एक १७ वर्षीय मुलगी असून दि.१३ रोजी उपचारादरम्यान मयत झालेल्या रुग्णाचीच ती मुलगी आहे.

यासंदर्भात आज सायंकाळी पाच वाजे अखेर एकूण ३९२ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१९, फेरतपासणीचे ५९ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४ नमुने होते. त्यापैकी आज ५५ अहवाल प्राप्त झाले. त्यात ५४ निगेटीव्ह व एक पॉझिटीव्ह अहवाल आला आहे. आजपर्यंत एकूण ३६१ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २८७ तर फेरतपासणीचे ६० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३४६ आहे.

आजअखेर जिल्ह्यात ३१ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात २९ प्राथमिक तर दोन फेरतपासणीचे नमुने आहेत. सद्यस्थितीत ७२ रुग्ण भरती आहेत.

आज जे ५५ अहवाल प्राप्त झाले त्यात एक नवीन रुग्ण पॉझिटीव्ह आहे. तर अन्य ५४ निगेटीव्ह आहेत. निगेटीव्ह अहवालात ४९ प्राथमिक तपासणीचे तर एक  फेरतपासणीतील व चार अहवाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आहेत.

जिल्ह्यात आज अखेर ४३६ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे.  त्यापैकी ८० जण गृह अलगीकरणात तर ९५ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण १७५ जण अलगीकरणात आहेत. १८८ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

ग्रामीण भागात २० हजार जणांची तपासणी

जिल्ह्यातील ग्रामिण भागात आजअखेर २० हजार ७३ जणांची तपासणी करण्यात आली  आहे, त्यात आज दिवभरात ८० जणांची तपासणी झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.  त्यापैकी २२६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे संदर्भित करण्यात आले आहेत. तर आज अखेर जिल्ह्यात १९ हजार ३८६ जणांचा अलगीकरण कालावधी पूर्ण झाला असून अद्याप ६८७ जण हे अलगीकरणात आहेत. त्यांचेवर वैद्यकीय पथके नियमित लक्ष ठेवून आहेत.

टिप्पण्या