महात्मा ज्योतिबा फुले यांना जिल्हा प्रशासन तर्फे अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांना जिल्हा प्रशासन तर्फे अभिवादन
अकोला:महात्मा ज्योतिबा फुले यांना आज 11 एप्रिल 2020 ला जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने, प्रा  संजय खडसे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी हार अर्पण करून.  अभिवादन केले,  या प्रसंगी महसूल विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते

महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे, मानवी जीवन मूल्य जपण्याकरिता घालवले. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून, त्यांनी कार्य केले, महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणेचा पाया घातला, यांच्या समानतावादी विचारावर आज, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्य होत आहे, स्त्री-सक्षमीकरणात मध्ये, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या  दाम्पत्याचे. फार मोठ्या प्रमाणावर योगदान आहे. पुण्यामध्ये 1897 ला प्लेगची साथ आली होती त्यावेळेस, सावित्रीबाई फुले, यांचा मुलगा डॉक्टर यशवंत दोघांनी प्लेगच्या रुग्णांची सेवा केली,बऱ्याच रुग्णांना त्यांनी जीवनदान दिले, प्लेग  मध्ये काम करताना सावित्रीबाई फुले यांना  आपले  प्राण गमवावे लागले, त्याचे कार्य आज ही प्रेरणा दायी आहे त्यांचे कार्य ही मानवाला ऊर्जा देणारे आहे. विचार प्रा संजय खडसे, उपजिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

टिप्पण्या