तूर व हरभरासाठी घोषित अनुदान रकमेचे वाटप त्वरित करावे-आमदार सावरकर

तूर व हरभरासाठी घोषित अनुदान रकमेचे वाटप त्वरित करावे-आमदार सावरकर
अकोला,दि १८ :शेतकऱ्यांनी सन २०१७ - १८ मधे विकण्यात आलेल्या तुर व हरभरा यासाठी घोषित करण्यात आलेल्या अनुदान रकमेचे वाटप २-३ दिवसात करा ,अशा सूचना आमदार रणधीर सावरकरांनी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकारी यांना केल्या.
 सन २०१७-१८ मधे शेतकरी यांनी तुर व हरभरा याकरिता नोंदणी केली होती. तथापि नाफेडकडून शेतकऱ्यांची तुर व हरभरा खरेदी करण्यात आली नव्हती, अशा शेतकऱ्यांना शासनाने अनुदान देण्याची घोषणा केली होती, या प्रश्नावर   सतत  सजगपहरी म्हणून काम करणारे शेतकरी चळवळीतून, समाजकारण व राजकारण करणारे अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या स्वतः पाठपुराव्यामुळे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची  शासन अनुदानची अकोला व वाशिम जिल्ह्यासाठी सुमारे ९ कोटी इतकी मंजूर रक्कम जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे शासनाने वितरित केली आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी पवार हे  covid-19 या महामारीमूळे ऊद्भवलेल्या लाँकडावून  मुळे मुंबई येथे अडकून आहेत, या कारणांमुळे बँकेच्या व्यवहारास अडचण निर्माण झाल्याचे समजताच आमदार रणधीर सावरकरांनी मार्केटिंग फेडरेशनच्या वरीष्ठ अधिकार्यांसोबत संपर्क साधून स्थानिक हजर असलेल्या अधिकारी यांना अधिकार देऊन शेतकरी वर्गाचे अनुदान ताबडतोब वितरीत करण्यात यावे अशा सुचना दिल्या आहेत.  सद्धया कोरोना महामारीच्या संकटामुळे शेतकरी वर्ग आधीच चिंतेत आहे, शिवाय तोंडावर असलेल्या खरीप हंगामाची मशागत व पेरणी पुर्व तयारीत आहे, अशा काळात शेतकरी यांना कोणतीही अडचण जाऊ नये यासाठी सर्व प्रयत्न करावेत व शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान त्वरित रक्कम जमा करावी असे मार्केटिंग फेडरेशनला बजावले आहे.
....  ..

टिप्पण्या