वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाही!

वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुट्या नाही!

अकोला: उच्च न्यायालयाने महिनाभराच्या प्रस्तावित उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनापासून बचावासाठी सध्या सुरू असलेली संचारबंदी ३ मे ला संपली, तर मुंबई उच्च न्यायालयाची मुंबई, औरंगाबाद, आणि नागपूर खंडपीठं उन्हाळी सुट्ट्या न घेता कामकाज सुरु करतील. सर्व जिल्हा न्यायालयात याप्रमाणेच कामकाज चालणार असल्याने वकिलांना यंदाच्या उन्हाळी सुटीचा उपभोग घेता येणार नाही.

याशिवाय न्यायालयाचे कामकाजही नेहमीच्या सकाळी ११ वाजे ऐवजी अर्धा तास आधी साडे दहा वाजता सुरु होईल, असं उच्च न्यायालयांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.  मात्र, ३ मे नंतरही संचारबंदी कायम राहिली तर न्यायालयाचं कामकाज सध्या कोविड-१९ लॉकडाउन मध्ये सुरु असलेल्या पद्धतीनुसारच सुरु राहणार आहे.

३मे नंतर आणि ७ जून पूर्वी न्यायालयीन कामकाज लॉकडाउन संपल्यानंतर नियमित स्वरूपात पूर्ववत करण्यात आले तर,अशा परिस्थितीत अकोला जिल्ह्यातील सर्व न्यायालये उन्हाळी सुटीचा उपभोग घेणार नाही. न्यायालयीन कामकाजाची वेळ सकाळी ११ ते सायंकाळी ५.४५ पर्यंत राहील. तर कार्यलयीन कामकाजची वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळ ६ वाजेपर्यंत राहिल.

जर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू होत असेल तर,अशा परिस्थितीत सर्व वकील आणि पक्षकार यांनी नवीन इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करावा. तसेच वकील व पक्षकारांकरिता वाहनतळ कोविड-१९ महामारीच्या आधी असल्याप्रमाणेच अमलात येईल,असे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश य.गो.खोब्रागडे यांनी गुरुवार २३ एप्रिल रोजी निर्देश दिले आहेत. याबाबतचे पत्र अकोला बार असोसिएशनला प्राप्त झाले असल्याचे अध्यक्ष ऍड.आनंद गोदे यांनी सांगितले.


टिप्पण्या