आजचे २४ अहवाल निगेटिव्ह; नव्याने ३ संदिग्ध दाखल

आजचे २४ अहवाल निगेटिव्ह; नव्याने ३ संदिग्ध दाखल

अकोला,दि.२५:जिल्ह्यात आज सायंकाळी पाचवाजेपर्यंत एकूण २४ अहवाल प्राप्त झाले.  ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.तर ३ संदिग्ध रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण ५३७ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ५२४ अहवाल आले आहेत.  आजअखेर एकूण ५०८ अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. आज अखेर १३ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ५३७ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४१९, फेरतपासणीचे ८१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५२४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४०७ तर फेरतपासणीचे ८० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३७ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५०८ आहे. आज प्राप्त झालेल्या २४ अहवालात सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात एकूण १६ कोवीडबाधीत रुग्ण होते. त्यातील दोघे मयत झाले. गुरुवारी (दि.२३) सात जणांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आता सात रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

आजअखेर जिल्ह्यात १३ अहवाल प्रलंबित आहेत.  त्यात १२ प्राथमिक तर एक फेरतपासणीचा आहे. जिल्ह्यात आज अखेर बाहेरुन आलेल्या ५४७ प्रवाश्यांपैकी  २३६ जण गृह अलगीकरणात तर ७८ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३१४ जण अलगीकरणात आहेत. २१२ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे. आज तीन जण नव्याने दाखल झाले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

टिप्पण्या