आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला निगेटिव्ह;२४तासानंतर परत चाचणी

आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल आला निगेटिव्ह;२४तासानंतर परत चाचणी

अकोलेकरांना मिळाला मोठा दिलासा

शहरातील २ आणि पातुरातील ४ जणांचा समावेश


अकोला: शहरातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णासह आठ पॉझिटिव्ह रुग्णांच्या फेर तपासणीचा अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला असल्याने अकोलेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांमध्ये अकोला शहरातील बैदपुरा व अकोटफैल भागातील तर पातूर येथील सहा जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण यांनी दिली.

अकोला जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून बैदपुरा भागातील एकाची नोंद झाली होती. त्यानंतर अकोट फैल भागात एक, तर पातूर तालुक्यातील सात जण आढळून आले होते. सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील आइसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. उपचारा दरम्यान या सर्व रुग्णांची परत वैद्यकीय चाचणी करण्यात आली.घसातील स्त्राव (थ्रोट स्वाब) घेवून चाचणी करिता पाठविले होते. या चाचणीचा अहवाल गुरुवारी सकाळी प्राप्त झाला.यामध्ये हे आठ रुग्ण निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला.

२४ तासानंतर होणार अजून तपासणी

निगेटिव्ह आलेल्या या रुग्णांची २४ तासानंतर परत तपासणी करून चाचणी करण्यात येईल.त्या चाचणीत हे रुग्ण जर निगेटिव्ह आढळून आले,तर त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येणार असल्याचे शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.

कोरोना अलर्ट

आज *गुरुवार दि.१६ एप्रिल २०२०* रोजी  सकाळी प्राप्त अहवालानुसार-

आज नव्याने दाखल रुग्ण संख्या- ४५

आज प्राप्त अहवाल- ३३

आजपर्यंत प्राप्त तपासणी अहवाल-२८५

पैकी २३८ निगेटीव्ह

पॉझिटीव्ह १४ (पैकी दोघे मयत झाल्याने आता शिल्लक १२ रुग्ण)

अप्राप्त अहवाल- २४

आज प्राप्त अहवालात आठ पॉझिटीव्ह रुग्णांच्या दुबार तपासणीच्या अहवालाचाही समावेश असून ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. विशेष म्हणजे ह्यात अकोल्यातील बैदपूरा भागातील पहिल्या रुग्णाचाही समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालया कडून प्राप्त झाली आहे.


जिल्हाधिकारी यांनी दिलेली माहिती:व्हिडीओ

 येथे करा क्लीक

आठ पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माहिती:व्हिडीओ

येथे करा क्लीक

२४ तासानंतर परत होणार चाचणी

https://youtu.be/bUjVGX038Dw

आपल्या प्रतिक्रिया खालील comment box मध्ये लिहा.
......



टिप्पण्या