Big breakingकोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू; चार पॉझिटिव्ह

Big breaking

कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू; चार पॉझिटिव्ह

अकोला,दि.२९: आज सायंकाळी सात वाजेपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे ३५  अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३० अहवाल निगेटीव्ह तर पाच अहवाल पॉझिटीव्ह आहेत आले. नव्याने पॉझिटीव्ह आढळेल्या पाच पॉझिटीव्ह रुग्णात एका मयत महिलेचा समावेश असून अन्य चार हे दीपक चौक परिसरातील   रहिवासी आहे. हे चौघे एकाच कुटूंबातील सदस्य आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजअखेर एकूण ६४९ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ६२२ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ५९५ अहवाल निगेटीव्ह २७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  ३२ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण ६४९ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५२१, फेरतपासणीचे ८७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६२२ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ४९६ तर फेरतपासणीचे ८५ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ४१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५९५ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २७  आहेत.

आज प्राप्त झालेल्या ३५ अहवालात ३० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर पाच पॉझिटीव्ह आहेत. निगेटीव्ह अहवालात सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील आठ जणांच्या अहवालाचाही समावेश आहे. सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील ५४ जणांची तपासणी आज पर्यंत झाली असून त्यातील ५० जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आता फक्त चार जणांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने स्पष्ट केले आहे.


सायंकाळी उशीरा आलेले पाचही अहवाल पॉझिटिव्ह

आज सायंकाळी सात वाजता प्राप्त पाच अहवालांत पाचही जण पॉझिटीव्ह आले आहेत. यात बैदपूरा भागातील महिलेचा समावेश आहे. ही महिला अत्यवस्थ अवस्थेत दि. २८ रोजी दुपारी  रुग्णालयात दाखल झाली. दाखल झाल्यावर काही वेळातच तिचा मृत्यू झाला. या महिलेच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आता सायंकाळी प्राप्त झाला. तो पॉझिटीव्ह आला. त्यानंतर उर्वरित चार जणांचे अहवाल ही पॉझिटीव्ह आले. हे चौघे एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. ते दीपक चौक परिसरात कलाल ची चाळ येथील रहिवासी आहेत. या कुटुंबातील एक सदस्य हा प्रशासनाने सुरु केलेल्या रेड क्रॉस संचलित फिव्हर क्लिनिक मध्ये गेला होता. तेथे त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्यास सांगण्यात आले.  त्यानुसार ते सर्व जण आलेही. मात्र ते लगेच निघून गेले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने मनपा, प्रांताधिकारी व पोलीस यांच्या सहाय्याने त्यांना घरून आणले. त्यांचे नमुने घेतले. आजच्या अहवालात ते चौघेही पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत वाढ

जिल्ह्यात आता एकूण कोवीडबाधीत रुग्णसंख्या २७ आहे. त्यात तिघे मयत आहेत. गुरुवारी (दि.२३) सात जण व सोमवारी (दि.२७) एका जणास असे आठ जण पूर्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आजअखेर १६ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, आजपर्यंत दाखल प्रवाशी संख्या ६५५ असून २८९ गृह अलगीकरणात तर ८४ हे संस्थागत अलगीकरणात असे एकूण ३७३ अलगीकरणात आहेत. आतापर्यंत २४० जणांची गृह अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत संपली आहे. तर विलगीकरणात ४१ रुग्ण दाखल आहेत. आज नव्याने तीन संदिग्ध रुग्ण दाखल झाले आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

......

टिप्पण्या