कस्तुरी ने केला वंचित कष्टकरी महिलांचा भावपूर्ण सन्मान

कस्तुरी ने केला वंचित कष्टकरी महिलांचा भावपूर्ण सन्मान
अकोला:समाजातील उपेक्षित कष्टकरी महिलांचा सन्मान करणे म्हणजे संस्कृती संवर्धन होय ज्यामुळे जीवनदृष्टी विकसित होते असे भावपूर्ण उदगार शहरातील प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सौ.अलका तामणे यांनी काढले.त्या स्थानिक कस्तुरी चॅरिटेबल सोसायटी द्वारे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित समाजातील वंचित कष्टकरी महिलांच्या सन्मान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी डॉ श्रीमती ज्योती बक्षी होत्या तर विचारपीठावर डॉ शांताराम बुटे,श्रीमती वंदना कुळकर्णी, कस्तुरी चे संस्थापक प्रा.किशोर बुटोले, श्रीमती शांताबाई आळशी,निलावंतिबेन जोगी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळ्याच्या प्रारंभी किशोर बुटोले यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देऊन शहरातील धुणीभांडी व घरकाम करणाऱ्या वंचित कष्टकरी महिलांचा सन्मान  करण्यामागील भूमिका विषद केली. 
याप्रसंगी शहरातील विविध भागात कार्यरत ५१ पेक्षा अधिक कष्टकरी महिलांचा साडीचोळी व गुलाबपुष्प देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला तसेच श्रीमती शांताबाई आळशी व श्रीमती निलावंतिबेन जोगी या मातांचा शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.यासमयी डॉ शांताराम बुटे , श्रीमती वंदना कुळकर्णी , सौ.अनिता कुळकर्णी , डॉ श्रीमती ज्योती बक्षी यांच्यासह कष्टकरी महिला श्रीमती संगीता गव्हाळे व कल्पना गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या सोहळ्याला "याची देही याची डोळा" अनुभवण्यासाठी मेक्सिको(अमेरिका)येथील संत सिद्धेश्वर शांतीदास आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री अशोक धामेचा यांची डेप्युटी इंजिनियर पदी पदोन्नती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी सर्वं श्री यशवंत देशपांडे, सौ मीरा देशपांडे, अमर शर्मा,मेघा कणकेकर, संजय ठाकरे, अनिल पालवे,चंद्रकांत देशमुख, चेतना आनंदानी,अपर्णा काळे,भाग्यश्री पांडे,परेशभाई जोगी,प्रा.डॉ मोहन खडसे, दामू नुपे, दीपक वाघमारे, पंडीत पळ सपगार, कल्याण व रामभाऊ रुपणोर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.पूर्वा कुळकर्णी यांनी केले तर मेघा कणकेकर यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली

टिप्पण्या