कृषि विद्यापीठात शिकवले जाणारे अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित

कृषि विद्यापीठात शिकवले जाणारे अभ्यासक्रम व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांच्या पाठपुराव्यास यश

अकोला:शासनाच्या कृषि पशुसंवर्धन दुग्धविकास विभागाने एक शासन निर्णय काढून कृषि विद्यापीठांतर्गत पदवी अभ्यासक्रमांना आजपासून व्यावसायिक
अभ्यासक्रम घोषित केले आहे. यासंदर्भात राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण,महिला व बालविकास, इतर मागासवर्ग,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी माननीय राज्यपाल, कृषिमंत्री, कृषिराज्यमंत्री, मुख्यसचिव, कृषि विभागाचे प्रधान सचिव यांच्या स्तरावर मागणी करून पाठ पुरावा केला होता.

पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्याकडे येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवेदन देऊन मागणी केली होती.
त्यानुसार यासंदर्भात आज शासन निर्णय निर्गमित झाला आहे.यात नमूद केल्यानुसार, कृषि परिषदेच्या बैठकीमध्ये ठराव पारित करुन शासनास शिफारस करण्यात आली होती. नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय प्राप्त करुन घेण्यात आले. हे अभ्यासक्रम व्यावसायिक घोषित नसल्यामुळे खल्या संवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलांबरोबरच अनुसुचित जाती, अनुसचित जमाती व विमुक्त जाती भटक्या जमाती
प्रवर्गातील विद्यार्थ्यांनासुध्दा शिक्षण शुल्क प्रतिपुर्ती होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण होत होता. त्यानुषंगाने, कृषि विद्यापीठांतर्गत खालील अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यात आले आहे-
१) बी.एससी.(एबीएम./बी.बी.एम.(कृषि)/बी.बी.ए.(कषि/बी.एससी. (ऑनसी (कृषि व्यवसाय
व्यवस्थापन)
२) एम्.एस्सी . (कृषी)
३) एम्.एस्सी. (उद्यानविद्या)
४) एम्.एस्सी. (वनशास्त्र) ५) एम्.एफ्.एस्सी. (मत्स्य विज्ञान)
६) एम्.टेक. (अन्न तंत्रज्ञान) 
७) एम्.एस्सी . (कृषी जैव तंत्रज्ञान)
८) एम्.टेक. (कृषी अभियांत्रिकी)
९)एम्.एस्सी . (गृह विज्ञान)
१०) एम्.एस्सी. (काढणी पश्चात व्यवस्थापन)
११) एम्.बी.ए. (कृषी)/एम्.बी.एम्. (कृषी)(व्यवसाय व्यवस्थापन) एन.एससी. (कृषि) कृषि व्यवसाय व्यवस्थापन / एम.एससी. (एबीएम)

टिप्पण्या