स्वच्छता आणि स्वनियंत्रणाने भयावह धोक्याशी लढणे शक्य- संदीप पुंडकर

स्वच्छता आणि स्वनियंत्रणाने भयावह धोक्याशी लढणे शक्य- संदीप पुंडकर 
अकोला दि २७:स्वच्छता आणि स्वनियंत्रण या माध्यमातून कोरोना वायरस या भयावह धोक्याशी लढणे शक्य आहे असे प्रतिपादन विदर्भ कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री संदीप पुंडकर यांनी आज जिल्हा महिला रुग्णालयात केले .
आमदार तथा संरक्षक ऑल इंडिया कैरम फेडरेशन श्री गिरीश व्यास यांच्या वाढदिवसानिमित्त मातृशक्ती आणि भावी पिढी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी साबण(400) हँडवॉश(400) सर्फ पुडे (1000) यांचे वितरण करताना ही समाजाप्रती बांधीलकी असल्याचे त्यांनी सांगितले.
राजकीय व समाजसेवी व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या व्यक्तींची आणि संबंधित संस्थांची उंची वाढविणारे असावे आणि आज अशा उपक्रमांची आवश्यकता आहे असे एडवोकेट सुभाषसिह ठाकूर कार्यकारी सदस्य यांनी विदर्भ कैरम एसोसिएशन द्वारा आयोजित कार्यक्रम वेळी सांगितले.
जिल्हा महिला रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर आरती कुलवाल यांना ही सामग्री देण्यात आली या उपक्रमामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल असे त्यांनी सांगितले डॉक्टर गजानन वाघोडे, प्रशांत राठी, पंकज राठी आदींनी या उपक्रमात योगदान दिले रुग्णालयाचे डॉक्टर नर्स व इतर उपस्थितांनी उपक्रमाचे स्वागत केले

टिप्पण्या