- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला शहरात २९ पानटपरी धारकांवर कारवाई
संग्रहित चित्र
अकोला,दि.२१: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मनाई आदेश असतांनाही पान टपरी सुरु ठेवणाऱ्या २९ जणांवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
अकोला,दि.२१: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर मनाई आदेश असतांनाही पान टपरी सुरु ठेवणाऱ्या २९ जणांवर कारवाई करण्यात आली. महानगरपालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
जिल्ह्यात कोराना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पानटपरी व पान तंबाखूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कारण पान, तंबाखू खाऊन थुंकणे यामुळेही कोरोना संसर्गाची शक्यता बळावते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आज दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे , तहसिलदार लोखंडे, मनपा आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर तसेच कर्मचाऱ्यांनी रतनलाल प्लॉट ,दुर्गा चौक, जठारपेठ, राऊतवाडी आदी भागात पाहणी करुन उघडी असलेली दुकाने बंद केली. तसेच २९ जणांवर कारवाईही केली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा