नागरिकांनी देखील सूचनांचे पालन करीत गांभीर्य ठेवावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी देखील सूचनांचे पालन करीत गांभीर्य ठेवावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जीवनाश्यक वस्तू, अत्यावश्यक सेवेमधील वाहतुकीस अडथळा नको

दि २४ मार्च २०२० रोजी मुख्यमंत्री यांच्या लाईव्ह प्रसारणातील महत्वाचे मुद्दे


1)मी काहीही बंद करायला आलेलो नाही.उलटपक्षी आपण करीत असलेल्या सहकार्यासाठी आपले आभार मानायचे आहेत.   

2)पहिल्या प्रथम मी केंद्र सरकारचे आभार मानतो. आमच्या विनंतीनुसार  आज रात्रीपासून देशांतर्गत विमान सेवा बंद होत आहे. गेल्या आठवड्यातच मी केंद्रीय अर्थमंत्र्यांना कर व जीएसटी  परतावा तारीख वाढवून देण्याची विनंती केली होती ती त्यांनी मान्य केली आहे त्यासाठी आभार. 

3)अजूनही सकाळी परत एकदा लोक गर्दी करताहेत असे चित्र आहे. ठीक आहे जीव्नाव्शाय्क वस्तू, औषधी, दुध ,भाजीपाला घेण्यासाठी बाहेर यावे लागणार आहे पण आपल्याला आता गांभीर्य ठेवावे लागणार आहे. मी पोलिसाना देखील यासंदर्भात सुचना दिल्या आहेत.  अनेक ठिकाणी या वस्तूंसाठी नागरिक बाहेर पडत असतील तर पोलिसांनी देखील त्याची योग्य खातरजमा करून घ्यावी.  

4)सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंची, शेतमाल, अन्नधान्याची वाहतूक, आणि संबंधित कामगार  ने आण करणारी वाहने अडवली गेली नाही पाहिजे अशा सुचना मी दिल्या आहेत. मात्र अशा अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या संस्था, कंपन्यांनी आपल्या वाहनांवर कंपन्यांचे नाव ठळकपणे लावावे तसेच कोणत्या आवश्यक वस्तूची वाहतूक करीत आहोत ते त्यात स्पष्ट लिहावे. वाहनांतील त्यातील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असावीत. अत्यावश्यक सेवेतील किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी अडचण येत असेल तर पोलिसांच्या १०० क्रमांकावर कॉल करा 

5)कालच पोलिसांनी काही लाख मास्क धाड टाकून पकडले त्यासाठी त्यांचे अभिनंदन, या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणीही साठेबजीची संधी घेऊ नये.  

6)जीवनावश्यक वस्तू आणि अन्न धान्याचा आपल्याकडे पुरेसा साठा आहे. मी आजच अन्न व नागरी पुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानाही सुचना दिल्या आहेत. अजिबात काळजी करू नका. 

7)या अशा परिस्थितीत स्वयंसेवी संस्था, मंदिरे मदतीसाठी पुढे आले आहेत. लालबागच्या राजाने रक्तदान शिबिरे सुरु केले आहे तर शिर्डी, सिद्धीविनायक यांनी देखील आपापल्या परीने मदतीची तयारी दाखविली आहे. 

8)मदत करणाऱ्या संस्थाना कुठेही अडचण येऊ नये अशा सुचना मी दिल्या आहेत. 

9)जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी अडथळा येऊ नये अशा सुचना पोलिसांना दिल्या आहेत.

10)हा महत्वाचा टप्पा आपण सर्वांच्या सहकार्याने पार पाडूत.

टिप्पण्या