अभ्यासाचे योग्य नियोजन करून स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हा

अभ्यासाचे योग्य नियोजन करून स्पर्धा परिक्षेत यशस्वी व्हा

                                                   --निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे

अकोला:  अभ्यासाचे योग्य नियोजन करून  स्पर्धापरिक्षेत यशस्वी  होण्याचे  आवाहन  निवासी उपजिल्हाधिकारी  संजय खडसे यांनी केले. आज दि. 5 रोजी  स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करतांना  ते बोलत होते.

या कार्यक्रमाला  उपजिल्हाधिकारी पुनर्वसन  श्री. शेलार,  शिक्षणाधिकारी प्राथमिक वैशाली ठग, ओक कोचिंग क्लासेसचे  संचालक नितीन ओक,  कुटे क्लासेसचे संचालक संतोष कुटे, इतिहासाचे अभ्यासक विवेक चांदुरकर ,  गुणवत्ता कक्षाचे समन्वयक गजानन महल्ले,  यांची प्रमुख उपस्थिती होती.

 श्री. खडसे पुढे म्हणाले की,स्पर्धा परिक्षेत यशस्वी होण्यासाठी  जिद्द, चिकाटी  व आत्मविश्वास अत्यंत आवश्यकता आहे. मी यशस्वी होईल ही जिद्द मनात ठेऊन त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. दररोज सातत्याने 10 ते 12 तास  अभ्यास करणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनातर्फे  मागील 4 वर्षापासुन स्पर्धा परिक्षा  मार्गदर्शन  घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील  30 प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड करून डॉ. आंबेडकर   स्वंयमदिप योजनेतंर्गत प्रशासनातर्फे  10 फेब्रूवारी पासुन सतत तीन ते चार तास स्पर्धा परिक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. असे सांगुन  आणखी 20 प्रज्ञावंत विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  जीव ओतुन अभ्यास करावा  लागतो असे  सांगुन  नितीन ओक म्हणाले की,  खातांना ,झोपतांना , उठतांना  पाणी पितांना सतत स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होण्याचा ध्यास मनाला लागला पाहिजे तरच  परिक्षेत उत्तीर्ण होवू शकतो.

प्रेरणा ,उर्जा  ,धडपड, वर्तणुक वातावरण याचा परिणाम मेंदुवर होवून  मन व मस्तीक स्पर्धा परीक्षासाठी तयार करावे असे शिक्षणाधिकारी वैशाली ठग  यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले. सततचा ध्यास  ,मेहनत , यातुनच  स्पर्धा परिक्षा यशस्वी होण्याचा मार्ग निघतो.

यावेळी उपजिल्हाधिकारी पुनर्वसन  श्री. शेलार, कुटे क्लासेसचे संचालक संतोष कुटे, इतिहासाचे अभ्यासक विवेक चांदुरकर  यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन निलेश गाडगे व आभार प्रदर्शन गजानन महल्ले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील ओळंबे यांनी विशेष प्रयत्न केले.

यावेळी नॅशनल लेवलला ऑल्‍म्पीऑड मध्ये  तीसरा स्तर उत्तीर्ण करणारे उर्जीत खंडारे यांचा तसेच सेवानिवृत्त झाल्याबद्दल नेहा शुक्ला यांचा सत्कार करण्यात आला.


टिप्पण्या