- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तीर्थक्षेत्र विकास करून संस्कृतीचे जतन-संजय धोत्रे
अकोला: आध्यात्म धार्मिक तसेच जनतेच्या सोईसाठी दुर्गक्षीत ग्रामिण भागातील तिर्थक्षेत्राचा विकास करून संस्कृती जतन व श्रध्देचा सन्मान करण्याची कृती केवळ भाजपा लोकप्रतिनिधी मध्ये असून अकोला पुर्व विधानसभा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी सतत प्रयत्नशील क्रीयाशील व जनतेशी नाळ जुडलेले आ. सावरकर यांनी दहिगांव गावंडे येथील मॉ. भवानी मंदिर परिसराचा विकास करण्याचा विडा उचलला आहे ही अभिनंदनीय बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री ना. संजयभाऊ धोत्रे यांनी केले.
अकोला पुर्वचे आ. रणधीर सावरकर यांनी तिर्थक्षेत्र पर्यटन विकास निधी अंतर्गत दहिगांव गावंडे येथील पंचक्रोशीतील श्रध्दास्थान भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने २ कोटी रूपये विकास निधी आणून विकास कामाचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदिप गुणवंतराव गावंडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. रणधीर सावरकर, तेजराव थोरात, रावसाहेब कांबे, जयंतराव मसने, अंबादास उमाळे, अनिल गावंडे, जि.प. सदस्य पवन बुटे, प्रकाश काळे, राजेश ठाकरे, दिगंबर गावंडे, जगतराव जायले, उज्वलाताई वानखडे, शंकरराव महल्ले, मनिराम टाले, शंकरराव वाकोडे, विठ्ठलराव चतरकर, बाबुराव गावंडे, संजय गावंडे, राजेश बेले, देवेंद्र देवर, जयकृष्ण ठोकळ, पुरण गावंडे, विजय ग. गावंडे, संदिप गावंडे, उमेश पाटील, वसंतराव गावंडे, भरत काळमेघ, सरपंच लिलाबाई चव्हाण, माधव मानकर, राजु पाटील गावंडे, अॅड. संतोष गावंडे, अभिमन्यू नळकांडे आदि मंचावर उपस्थीत होते.
सार्वजनिक कामात दहिगांव गावंडे सर्वात पुढे असते या गावाचा विकासासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, माजी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी २ कोटी रूपये या मंदिराच्या विकासासाठी उपलब्ध करून दिले. ७० वर्षात विदर्भाचा विकास थांबला होता परंतु भाजपा महायुतीच्या काळात ना. फडणवीस यांनी भरघोष निधि देवून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत निधी देवून विकास साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जय जवान जय किसान जय विज्ञान जय अनुसंधान कार्य सुरू असल्याचे ना. धोत्रे यांनी याप्रसंगी सांगीतले तर आ. रणधीर सावरकर यांनी शासनाचे आभार व्यक्त करून विकास पर्वाला बळ देवून दुर्लक्षीत ग्रामिण क्षेत्रातील तिर्थस्थळाचा विकास करण्याचा ध्यास घेतला. त्यामुळे या परिसरातील भक्तांना सुखसोई, दळणवळण व रोजगाराची संधी मिळेल असा आशावाद व्यक्त केला. ना. धोत्रे आ. सावरकर यांना वारकरी संप्रदायाच्या वतीने आशिर्वाद देण्यासाठी ह.भ.प. प्रभाकर महाराज भदे व तुळशीदास बोपुलकर महाराज, हिरालाल महाराज आदिंनी आशिर्वाद दिले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रर्दशन अॅड. संतोष गावंडे यांनी तर प्रास्ताविक दिगंबर पाटील गावंडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहराव ठोकळ, किशोर काकडे, गणेश बेहरे, डॉ. दिलीप गावंडे, विलास खंडारे, विजय गो. गावंडे, रंगराव टेके, अशोक भदे, सुभाष टेकाडे, प्रदिप तायडे, डॉ. अनिल गावंडे, गगांधर मुरकुटे, संतोष ठाकरे, अक्षय गावंडे, देवमन खंडारे, दिलीप नाईक, मनोहर मालठाणे, भिकमदास गावंडे, नितिन पाटील, रामकृष्ण पाचपोळ, शिवाजी भरणे, वाल्मिक कावरे, जगदेवराव इंगळे, भाष्कर गावंडे, दिपा पाटील, संजय गुणवंतराव गावंडे, अवधुत झटाले, मंगेश हिंगणे, गजानन गावंडे, गोलू गावंडे, पांडूरंग आवारे, दशरथ झटाले, विलास मालठाणे यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा