- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
इर्शाद खान , आनंद गोगलिया, पलाश यादव व अजय डोंगरे यांची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड
अकोला: अकोला दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या 4 खेळाडूची निवड चेन्नई(तामिळनाडू) येथे आयोजित दिव्यंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत, अकोला जिल्हातील इर्शाद खान- ऑलराऊंडर (अकोला -कर्णधार) , आनंद गोगलिया(कीपर व बॅट्समन,), पलश यादव(बॅटमॅन) , अजय डोंगरे (ऑलराऊंडर) या 4 जणांची महाराष्ट्र संघात निवड झाली.अनेक राज्यस्तरीय दिव्यंगच्या स्पर्धेत अकोला संघाने उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. गोंदिया येथे अकोला संघ उपविजेता, अकोला येथे विजेता तर बुलडाणा येथेही अकोला संघाने उपविजेते पद पटकावले .अकोला संघाला मार्गदर्शक म्हणून ,आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनील वानखडे(दिव्यांग खेळ व क्रिडा संघटक-प्रशिक्षक तथा सचिव दि अकोला जिल्हा पॅरालिंपिक असोसिएशन) यांनी कार्य केले. निवड झालेल्या सर्व खेळाडूचे फिजिकली चॅलेंज क्रिकेट असो.अकोला , पॅरालीम्पिक असो.अकोला, अकोला पॅरा स्पोर्ट ऍकॅडमी, सिटिंग हॉली बाल संघ , दिव्यांग बेरोजगार संघटना ,दिव्यांग कर्मचारी संघटना , सुनील वानखडे, संजय बरडे,भरत डीक्कर, सनथ डोंगरे ,रवी ठाकूर,मोहन दुर्वेकर ,अनिल बिडवे,मो.अजीज, श्रीकांत देशमुख ,व दिव्यंग खेळाडू व क्रीडा प्रेमी यांनी राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा