भारतीय स्वातंत्र्य-लढ्यातील क्रांतीवीरांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर

भारतीय स्वातंत्र्य-लढ्यातील क्रांतीवीरांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर
सैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, धर्मसुधारक व समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची आज पुण्यतिथी.
भारतीय स्वातंत्र्य-लढ्यातील क्रांतीवीरांचे मुकुटमणी म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ओळखले जातात. ते श्रेष्ठ देशभक्त होतेच, तसेच दैवी प्रतिभेचे वक्ते, लेखक, कवी,समाजसुधारक, इतिहासकार, तत्त्वज्ञानी, प्रज्ञावान पंडित अशा अनेक गुणांनी संपन्न होते. एवढा बहुगुणी नेता आपल्या देशाला लाभला हे आपले परमभाग्यच मानावे लागेल.ते स्पष्टवक्ते व देशहितभक्त होते. “ हा हिंदुस्थान आहे. इंडिया नाही. हिंदुत्व हेच या देशाचे
राष्ट्रीयत्व आहे. हा देश जर देश म्हणून राहावयाचा असेल, राहावा असे वाटत असेल, तर या देशाचे बरेवाईट ते माझे बरेवाईट, असे मानणारा जो नागरिक आहे, तो केवळ हिंदूच आहे, या वस्तुःस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून हा हिंदूंचा देश आहे, हे हिंदुराष्ट्र आहे." हे
सत्य सावरकरांनी खणखणीत आयुष्यभर मांडले, त्यासाठी ते झगडले.
अशा या क्रांतिकारकाचा जन्म २८ मे १८८३ रोजी नाशिक जिल्हातील भगूर या गावी झाला.मराठी पाचवीपर्यंतचे शिक्षण येथेच झाले. पुढील दोन इयत्ता घरीच केल्या. वयाच्या तेराव्या वर्षी
नाशिकच्या शिवाजी हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला. १९०१ साली मॅट्रीक झाले. इंग्रजी व इतिहास हे त्यांचे आवडीचे विषय होते. शाळेत असतानाच लो. टिळकांच्या लिखाणाने त्यांची राष्ट्रीयवृत्ती जागृत झाली. उच्च शिक्षणासाठी ते पुण्याला आले. पुणे हे क्रांतीवीरांचे माहेरघरच होते. पुढे त्यांनी अभिनव भारत ' नावाच्या एका जहाल क्रांतिकारक संस्थेची स्थापना केली. १९१०
साली त्यांना दोन जन्मठेपी व १० वर्षे काळेपाणी अशी ५० वर्षांची सजा झाली. त्या काळात त्यांनी भरपूर लिखाण केले. ते लिखाण अजरामर ठरले. कर्मकांडावर कठोर प्रहार करणारे सावरकर, हिंदुत्वावर मात्र अत्यंत तळमळीने, आत्मीयतेने बोलत. कारण ते विचारांचे पूजक होते.राष्ट्राबद्दल त्यांचा अभिमान वस्तुनिष्ठ होता. हे राष्ट्र स्वतंत्र झाल्यावर, त्यांनी आपल्या घरावर
अशोकचक्र असलेला तिरंगी झेंडा लावला आणि मग त्याच्याखाली भगवा झेंडा लावला.सर्वतोपरी लोककल्याणासाठी झटणाऱ्या धर्माचे प्रतीक असलेला भगवा झेंडा त्यांनी अभिमानाने फडकविला. राष्ट्राला त्यांनी मोठे मानले.२६ फेब्रुवारी १९६६ रोजी दादर येथील सावरकर सदनात वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन
झाले.

टिप्पण्या