पिंजर येथे दीपक सदाफळे सन्मानित

पिंजर येथे दीपक सदाफळे सन्मानित
अकोला:डाॅ.वासुदेव भगत ( *राज्यशास्त्र विभाग प्रमुख बी.एल.डी. काॅलेज पिंजर*) यांच्या संकल्पेतुन *11 फेब्रुवारी 2020 रोजी*विषय आधारित जागृकता आणी शिक्षा कार्यक्रमात दीपक सदाफळे यांना शाल श्रीफळ आणी सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. 
*दीपक  सदाफळे यांनी   तालुक्यातील वेगवेगळ्या विभागातुन आलेले युवक आणी बि.एल.डी.काॅ. पिंजर च्या विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातुन विशेष मार्गदर्शन केले,*
भाऊसाहेब लहाने आर्टस काॅलेज* आणी *नेहरु युवा केंद्र अकोला* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विषय आधारित युवा जागृकता एवम शिक्षा कार्यक्रमात *Development of youth*  
*या विषयावर आपल्या मार्गदर्शनातून जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी म्हटले आहे की युवकांनी सामाजिक विकास आणी सकारात्मक जिवनाला घडविणारे तथा समाजाच्या आणी देशाच्या आवडीचे आणी गरजेचे ध्येय  निवडुन त्यावर आपली स्वतंत्र घट्ट अशी पकड असावी. तरच आपले हे धेय यशाची यशस्वीपणे शिखरे गाठतात,आणी या नंतर आपल्या चांगल्या "विचारांची" शीदोरी आपण सार्वजनिक ठिकाणी सोडुन समाजातील सर्व घटकांना मिळेल यासाठी प्रयत्नशील असावेत.असे अमुल्य मार्गदर्शन उपस्थित युवक आणी विद्यार्थ्यांना दिले.* 
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष *भा.ल.आ.काॅ.चे प्रा.श्री.डाॅ.विनोद खारोडे सर* प्रमुख पाहुणे *श्री.गजाननभाऊ अहमदाबादकर कारंजा, हे होते.श्री.राहुलभाऊ राऊत,मा.ता.नेहरु युवा केंद्र समन्वयक,डाॅ.श्री.वासुदेव भगत सर,प्रा. श्री.मनोज फडणीस सर,प्रा.श्री.पंकज तायडे सर, प्रा.श्री.अशोक वाहुरवाघ सर,प्रा.श्री.रामकृष्ण गावंडे सर,श्री.सुळे सर,श्री.मनवर सर, सौ.रेखा काळपांडे मॅडम, श्री.अणील ठाकरे सर,श्री.गीरी सर,* आणी बि.एल.डी.काॅ. पिजरचे सर्व कर्मचारी तथा तालुक्यातील नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी आणी सर्व विद्यार्थी मोठया प्रमाणावर हजर होते.गजानन भाऊ अहमदाबादकर तसेच प्रा.विनोद खारोडे सर,राहुल राऊत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.वासुदेव भगत सर यांनी तर आभार राहुल सावंत यांनी केले.

टिप्पण्या