पहिली जलद बुद्धिबळ स्पर्धा अकोल्याचा प्रवीण हेंड उपविजेता

पहिली विदर्भस्तरीय आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळ स्पर्धा अकोल्याचा प्रवीण हेंड उपविजेता
राहुल भारसकले १० व्या स्थानी

श्लोक चंद्राणी १३ वर्ष मुलाच्या वयोगटामध्ये विजेता

 देवांशी गावंडे १३ वर्ष मुलींच्या गटात उपविजेता 

बिगर मानांकित कबीर तायडे ची जोरदार कामगिरी

विदर्भ चेस अससोसिएशन नागपूर यांच्या तर्फे  पहिल्या विदर्भस्तरीय  आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे  आयोजन नागपूर येथे करण्यात आले होते।  ही स्पर्धा अखिल मराठी बुद्धिबळ संघटना महाराष्ट्र राज्य, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व जागतिक बुद्धिबळ संघटना फिडे यांच्या मान्यतेने घेण्यात आली.
स्पर्धेचे आयोजन २५ते२६। जानेवारीला धनवटे नॅशनल कॉलेज विमल ताई मातोश्री सभागृह नागपूर येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत तब्बल 270 खेळाडूंनी विदर्भातून प्रवेश नोंदविला. ज्यामध्ये तब्बल १०८ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंनी प्रवेश नोंदविला ही स्पर्धा 9 फेर्यामध्ये पार पडली.
या स्पर्धेमध्ये ४ थे मानांकन देण्यात आलेल्या प्रवीण हेंड ने आपल्या नावाला साजेशी खेळी करत 9फेर्यामध्ये तब्बल 8 विजय मिळवत स्पर्धेच्या उपविजेते पदावर आपले नाव कोरले. या दरम्यान त्यांनी ८ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा पराभव केला.
या स्पर्धेमध्ये राहुल भारसकले यांनी 9 फेर्यामध्ये ६.५ गुनाची कमाई करत  १० व्या क्रमांक पटकाविला तर देवाशी गावंडे ही स्पर्धेमध्ये १३ वर्षाखली मुलींच्या गटात उपविजेति ठरली तिने ९ फेर्यामध्ये ५.५ गुणांची कमाई केली. कबीर बाळासाहेब तायडे याने पण उत्कृष्ट कामगिरी करत ९पैकी ५ फेऱ्या जिंकल्या।
सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विदर्भ चेस अससोसिशन चे सचिव श्री आर न .श्रीवास स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण पानतवणे दीपक चव्हाण हे उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमेश पणबुडे यांनी केले.

टिप्पण्या