श्री गणेश कला महाविद्यालयात गाडगेबाबांना अभिवादन

श्री गणेश कला महाविद्यालयात गाडगेबाबांना अभिवादन
अकोला:स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतीच वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य ,डॉ. के.व्ही.मेहरे हे तर प्रमुख उपस्थिती मध्ये महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. प्रभाकर मोहे तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. जयंत राऊत हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉ. प्रभाकर मोहे यांनी गाडगेबाबांच्या जिवनावर यथोचित प्रकाश टाकून उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रा. जयंत राऊत यांनीसुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना गाडगेबाबांचे जीवन साधे आणि सरळ असून आपल्याला प्रेरणा देणार आहे अशा प्रकारचे विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्राचार्य, डॉ. के .व्ही .मेहरे यांनी संत गाडगेबाबा हे चालतं बोलतं विद्यापीठ होतं व त्यांनी दीनदुबळ्या समाजाला शिक्षणाचे महत्व तसेच स्वच्छतेचा महामंत्र देऊन समाजाला खूप मोठी शिकवण दिली असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बि.यू .जामनिक यांनी तर आभार प्रदर्शन संगीत विभागाचे प्रा. सुधाकर मनवर यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या