आसेगाव बाजार येथे विदर्भ लहुजी सेना शाखा उदघाटन

आसेगाव बाजार येथे विदर्भ लहुजी सेना शाखा उदघाटन 
अकोट : ग्राम आसेगाव बाजार येथे  विदर्भ लहुजी सेना नाम फलकाचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. संस्थापक-अध्यक्ष मेजर महादेव रावजी खंडारे यांच्या हस्ते फीत कापुन उदघाटन केले. 
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज या महान विभूतींच्या पुतळ्यांना हर अर्पण करून केली प्राध्यापक अविनाश पवार विभागीय अध्यक्ष लहुजी सेना यांनी आपल्या प्रास्ताविकातून विदर्भ लहुजी सेना एक सामाजिक धगधगती चळवळ असून समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी सामाजिक संघटना आहे असे आपल्या प्रास्ताविक भाषणात तून विचार मांडले. महादेव रावजी खंडारे यांनी आपल्या प्रबोधनात्मक मार्गदर्शनात तरुणांना स्पर्धा परीक्षा तसेच महिलांना सक्षमीकरणाचे धडे दिले याप्रसंगी दिनेश जी हांडे यांनी आपले विचार व्यक्त केले. 
   याप्रसंगी मनोज तायडे, अमोल खंडारे, संतोष तायडे अशोक खंडारे गणेश खंडारे निलेश खंडारे कुणाल कलाने योगेश खंडारे अनिल तायडे निलेश तायडे राजेश खंडारे प्रवीण खंडारे सचिन वाघमारे रवी खंडारे निखिल खंडारे मंगेश वाघमारे हर्षल गवई सागर कलाने रोहित कलाने अक्षय कलाने विक्की कलाने मयूर तायडे, (रोहनखेड शाखाप्रमुख) अंकुष वाघमारे अमोल कलाने, उमेश कलाने, दीपक खंडारे इत्यादी विदर्भ लहुजी सेना सदस्य उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनराज गवई यांनी  केले.


टिप्पण्या