३२ व्या स्काऊटस् आणि गाईड्स जिल्हा मेळाव्यात "जय बजरंग" प्रथम

३२ व्या स्काऊटस् आणि गाईड्स जिल्हा मेळाव्यात "जय बजरंग" प्रथम
अकोला: दिनांक ०५ ते ०८ फेब्रुवारी २०२० या कालावधीत संत सखाराम महाराज विद्यालय मोखा.ता.बाळापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत स्काऊटस् आणि गाईड्स ३२ वा जिल्हा मेळावा व कब बुलबुल उत्सवाचा विधिवत समारोप शनिवार दी.०८/०२/२०२० रोजी करण्यात आला.
            दि.०६ ते ०८ या कालावधीत तंबू निरिक्षण स्पर्धा,शारिरीक प्रात्यक्षिके स्पर्धा,बिन भाड्यांचा स्वयपांक स्पर्धा,गँझेट्स स्पर्धा,शेकोटी स्पर्धा (नृत्य व नाटिका),शोभा यात्रा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
            *या मेळाव्यातील सतत तीन दिवस चालणारी,सर्वांना आकर्षित करणारी नाविन्यपूर्ण आणि कठीण स्पर्धा म्हणजे तंबू निरिक्षण स्पर्धा..! स्काऊट विभागातील याच स्पर्धेत स्काऊट मास्टर बि.एस.तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात "जय बजरंग विद्यालय कुंभारी येथील महात्मा फुले स्काऊट पथकाने" आपले कौशल्य पणाला लावून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.या स्पर्धेत दिक्षा भुमी थीम(प्रवेश द्वार),भांड्यांची रॅक,बुट स्टॅण्ड,ब्लँकेटस् स्टॅण्ड,कपड्यांचे हॅकर,टॉवेल स्टॅण्ड,स्वेटर स्टॅण्ड,आरसा स्टॅण्ड, बॅग स्टॅन्ड, चिडिया घर, हँण्ड वाँश,ड्रेसिग चेअर, अभिप्राय डायस, फलक कार्य इत्यादी आकर्षक गॅझेट्स स्काऊट बांधण्यातून तयार करण्यात आले होते.परिक्षकाच्या अंतिम तंबू निरीक्षणा दरम्यान पथकाला प्रथम क्रमांक तर गॅझेट्स स्पर्धेत दुसरा क्रमांक देण्यात आला. उल्लेखनीय कार्याबद्दल  समारोपीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते स्काऊट सह श्री तायडे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सतत पाच वर्षे तंबू निरिक्षण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी कुंभारीची एकमेव शाळा आहे* 
अकोला जिल्हांचे जिल्हा आयुक्त स्काऊट, माध्य.शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद साहेब,राज्याचे उप मुख्य माजी आयुक्त, जिल्हा चिटणीस वसंतराव काळे, जिल्हा संघटक सोनिया सिरसाट, बि.बी.सानप, विदर्भ मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, स्थानिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख, विमाशी चे जिल्हाध्यक्ष विजय ठोकळ, मेळावा प्रमुख,शाळेचे मुख्याध्यापक रमाकांत, सुमनताई कराळे, शालिनी तायडे, सुषमा देशमुख इत्यादी मान्यवरांनी टेन्टला भेटी देवून विशेष कौतुक केले.
यशस्वी स्काऊट आणि स्काऊट मास्टर यांचे संस्थेचे संस्थापक माजी आमदार गुरुवर्य प्रा तुकाराम बिरकड, नारायणराव गावंडे, डाँ.नारायणराव बिरकड, प्रकाश बिरकड, प्राचार्य विलास इंगळे, प्रा.श्रीराम पालकर,  पर्यवेक्षक संतोष गावंडे,सुनिल फोकमारे, रमेश अढाऊ,  अविनाश ढोरे, संध्या ताडे, सिताराम शिंगाडे, पि.जे.राठोड, श्रीकृष्ण डांबलकर, वंसत माळी, आर,आर,पातळे, मनोज बगले, विष्णुदेव इंगळे, दत्तात्र्यय सोनोने, वसंत ढोकणे, रमेश चव्हाण इत्यादींनी विशेष गौरवार्थ अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
*"दिक्षा भुमी" थिम घेऊन साकारलेला तंबू आणि मनमोहक गॅझेट्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते हे विशेष..!*
            
              

टिप्पण्या