मातोश्री मित्र परिवार तर्फे राज्स्थरीय क्रिकेट सामने

मातोश्री मित्र परिवार तर्फे राज्स्थरीय क्रिकेट सामने 
अकोला: ०२ फेब्रुवारी मातोश्री मित्र परिवार तर्फे राज्स्थरीय टेनिस बॉल सामन्याचे उद्घाटन मोठ्या थाटात डाबकी रोड अकोला येथे संपन्न झाले आहे. ह्या सामन्यात दीड लाखाच्यावर बक्षीस वितरण होणार आहे त्यामध्ये ग्रामीण साठी वेगळे तर शहरी साठी वेगळे पारितोषिक वितरीत होणार आहे. शहरी भागाचे पहिले बक्षीस भाजपा प्रदेश उपाध्यक्ष शोसल मिडिया महाराष्ट्र राज्य शरद झांबरे पाटील यांच्या वातीने २५००१ रोख व चषक देण्यात येणार शहरी भागाचे दुसरे बक्षीस ११००१ नगर सेवक आशिष पवित्रकार यांच्या हस्ते तर ग्रामीण गटासाठी प्रथम बक्षीस १५००१ नगर सेवक हरीश भाई अलिमचंदानी तर ग्रामीण साठी दुसरे बक्षीस ११००१ नगर सेवक राजेश मिश्रा तसेच उत्तेजनार्थ म्यान ऑफ दि  सिरीज साठी शहरी साठी आणि ग्रामीण साठी २५००/२५०० ऍड. पप्पू मोरवाल तसेच प्रत्येक ह्याट्रीक विकेट साठी ट्रक सूट अप्पर देण्यात येईल.  उद्घाटनाला उद्घाटक म्हणून लाभलेले (निवासी उपजिल्हा अधिकारी अकोला) श्री. प्रा. डॉ संजय खडसे आणि प्रसिध्द अस्थिरोग तज्ञ डॉ. अभय पाटील हे आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भा.ज.पा.प्रदेश उपाध्यक्ष सोशल मीडिया शरद झांबरे पाटील हे होते तर नगरसेवक श्री हरीश आलमचंदानी श्री संजय तीकांडे व श्री आशिष पवित्रकार, डॉ. अमोल रावनकर , रमेश गोतमारे, नगरसेवक सुनील क्षीरसागर,  मंगेश गीते, विलास गोतमारे ,नंदू आवारे , संजय चौधरी अभिषेक खाडसाले, दिनेश सरोदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. एकनाथ खेडकर यांनी केले. व आभार प्रदर्शन क्रिकेट सामन्याचे समालोचन ओम सोनुने यांनी मानले. 
अनेक सामाजिक उपक्रमा सोबत भव्य क्रिकेट सामन्यचे आयोजन हे दरवर्षी मातोश्री मित्र परिवार करत असतो. यशस्वीसाठी मातोश्री प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष  योगेश ढोरे, उपाध्यक्ष उदय घोगरे, सुनील गीते, प्रवीण श्रीवास्तव, सुधीर शिंदे, शुभम वाकोडे, रुपेश ढोरे, रोहित इचे, रितेश श्रीवास्थव, राम गावंडे,प्रवीण मानकर, दिपक काटे, हरीश बोंडे, अतुल पटुकले, हरीश पांडे, अमोल डीवरे, निलेश ठाकरे, राम पारस्कर, धीरज देशमुख, विकास टाले, राम पन्हाडकर,चेतन तोडकर, शुभम इंगळे, शुभम दादळे यांनी अथक परिश्रम घेतले. सामन्याचे बक्षीस वितरण दि. १६ फेब्रुवारी संध्याकाळी ६.०० वाजता करण्यात येईल. अशी माहिती मातोश्री मित्र परिवार तर्फे श्री योगेश ढोरे यांनी दिली.

टिप्पण्या