घटनेतील सिद्धांत व मूलभूत अधिकाराच्या जागरणाने कल्याणकारी राज्याची संकल्पना -न्या.गवई

घटनेतील सिद्धांत व मूलभूत अधिकाराच्या जागरणाने कल्याणकारी राज्याची संकल्पना -न्या.गवई  
विधी विद्यालयाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गवई यांचे मार्गदर्शन 
अकोला:राज्यघटना ही भारतातील कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेची गुरुकिल्ली आहे. घटनेत कल्याणकारी राज्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. राज्यघटनेतील निर्देशक सिद्धांत व मूलभूत अधिकाराच्या जागरणाने कल्याणकारी राज्याची संकल्पना साकार होऊ शकते.यासाठी कल्याणकारी राज्यासाठी विकासात्मक सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले
 दि अकोला एज्युकेशन सोसायटीच्या शतकीय वाटचालीच्या निमित्ताने रामदास पेठ पो स्टे.समोरील अकोला विधी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.या अधिवेशनात स्व.बालचंद लोहिया स्मरणार्थ आयोजित प्रगतीशील कायदे आणि कल्याणकारी राज्य या विषयावर न्या.गवई मार्गदर्शन करीत होते.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सौ पुष्पा गणेडीवाल, जिल्हा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश न्या.खोब्रागडे उपस्थित होते.अकोला एजुकेशन सोसा.चे अध्यक्ष प्रा.भाऊसाहेब मांडवगणे यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष विलास देशपांडे,संस्थेचे सचिव,एस.आर.अमरावतीकर, प्रा,एस.सी.भंडारी, प्राचार्य रत्ना चांडक आदी उपस्थित होते.  
आपल्या व्याख्यानात न्या.गवई  यांनी राज्य घटनेच्या अनुषंगाने कल्याणकारी राज्याची संकल्पना अनेक अनुच्छेदाचा आधार घेत मांडली. यावेळी अनेक राज्यात उच्च न्यायालयात यासंदर्भात झालेल्या लवादाची माहितीही दिली. ते म्हणाले,राज्य घटनेत मूलभूत हक्क मर्यादा नमूद केली आहे.कल्याणकारी राज्याची संकल्पना ही अनेक घटनेच्या आर्टिकलच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे.मूलभूत हक्क नागरिकांना प्रदान करणे हे शासनाचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रातील सर्व नागरिकांच्या विकासात्मक आलेखाची गुरुकिल्ली असणारी राज्यघटना अगदी महिला-मुलांच्या हक्काची संकल्पनाही मांडते. घटनाकारांनी 'वन पर्सन,वन  व्हॅल्यू' ही लोकशाहीची संकल्पना अभिप्रेत केली आहे.त्यासोबतच सामाजिक न्याय,सामाजिक समानता,स्वातंत्रता,अभिव्यक्तीची स्वतंत्रता आदी लोकशाहीला पूरक असलेली तत्वे राज्यघटनेने नागरिकांना प्रदान केली आहेत. लोकशाहीची ही महत्पूर्ण अंगे सुरळीतपणे जर चाललीत तर नक्कीच कल्याणकारी राज्याची निर्मिती आपोआप होऊ शकते. राज्यघटनेतील संशोधनामुळे अंतिम टोकाच्या माणसाला न्याय मिळाला आहे. अनेक वेळा संशोधन केलेल्या राज्यघटनेत अनेक आमूलाग्र बदलही करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर शैक्षणिक हक्क हा नवा पायंडा ही राज्यघटनेत नमूद केला गेला आहे. समाजात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी भारतीय व्यवस्थेतील अनेक महामानवांनी अभूतपूर्व योगदान दिले असल्याची आठवणीही त्यांनी यावेळी काढली. सावित्रीबाई फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक अधिष्ठान आणि सामाजिक समता खऱ्या अर्थाने प्रस्थापित होऊ शकली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.त्याचाच परिणाम म्हणजे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण, महिलांना सर्वतोपरी अधिकार,त्यांचे संरक्षण,उत्थान आदी  बाबीचा उहापोह व्यवस्थेत कल्याणकारी राज्यासाठीच करण्यात आला असल्याचे सांगून अकोला एजुकेशन सोसा.च्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.
दीप प्रज्वलनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी आपल्या मनोगतात  प्रा.मांडवगणे यांनी  शतकापर्यंत वाटचाल करीत असणाऱ्या या संस्थेच्या उपक्रमाची माहिती दिली.या सोहळ्यात न्यायमूर्ती भूषण गवई यांचा संस्थेच्या वतीने भावपूर्ण शाल ,श्रीफळ,स्मृतिचिन्ह प्रदान करून भावपूर्ण गौरव करण्यात आला.यावेळी महाविद्यालयात विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयाचे बक्षीस तसेच स्व.श्रीमती कांचनबाई भंडारी,स्व.तुळशीरामजी मोरवाल,एड.पप्पू श्रीराम मोरवाल, स्व.गोमतीबाई चांडक,स्व.ऍड.जी के सारडा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.यामध्ये यामध्ये विद्यापीठातून तिसरी मेरिट आलेली प्राजक्ता गावंडे,चौथी मेरिट आलेली सबा मो.इलियास,एड. शुभम मोहता आदी तसेच मान्यवरांच्या हस्ते विधी आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.यामध्ये डॉ.पूनम सोनवणे,डॉ.सुशांत चिमणे,डॉ.संदीप नगराळे,डॉ.नंदकिशोर रामटेके,डॉ.एजाज अहमद,डॉ.राकेश अग्रवाल,डॉ.योगिनी वाघेला,डॉ.नीशाली पंचगाम आदींना सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक अकोला विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य रत्ना चांडक यांनी,संचालन अनामिका सहगल, नितु ठाकूर, यांनी तर आभार प्रदर्शन शार्दुल दिगंबर यांनी केले.राष्टरागीताने सोहळ्याचे समापन करण्यात आले. 
सत्र च्या उत्तरार्धात राष्ट्रीय संमेलन संपन्न झाले.उद्योजक जयंत पडगिलवार यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात अमरावती विद्यापीठाच्या हुमॅनिटीज विभाग डीन डॉ.अविनाश मोहरील,विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या अध्यक्ष डॉ सुप्रभा यादगिरवार आदी यावेळी उपस्थित होते.मान्यवरांचे हस्ते यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानित करून गौरविण्यात आले.यावेळी बेस्ट पेपर प्रेसेंटेशन मध्ये विजयान्जली बढे ही   उकृष्ट ठरली.या समारोपीय सोहळ्यात न्यायाधीश,विधीज्ञ,विधी विद्यार्थी,संशोधक,अधिकारी व न्यायालयीन वर्ग समवेत महाविद्यालयाचे प्रा.सीमा शिरसाट,प्रा.बंटी डोडेजा,प्रा.संगीता भोम्बले,प्रा.पावन चौहान,प्रा.सपना वैद्य,प्रा.राखी जैस्वाल उपस्थित होते.

टिप्पण्या