श्रीरंग सावरकरची आर्चरी वर्ल्ड कपच्या चाचणी करीता निवड

श्रीरंग सावरकरची आर्चरी वर्ल्ड कपच्या चाचणी करीता निवड
अकोला:सोनिपथ हरियाणा येथे होणाऱ्या वर्ल्ड कप निवड चाचणी करीता 27 फेब्रुवारी ला श्रीरंग रवाना होणार आहे , तिथे निवड चाचणी ही वर्ल्ड कप स्टेज 1 व स्टेज 2 या दोन्ही चाचण्या होणार असून, त्यातून भारताचा संघ निवडला जाणार आहे. स्टेज 1 हा guatemal city येथे होणार आहे तर स्टेज 2 हा शांघाय चायना येथे होणार आहेत.  निवड चाचणी ही सोनिपत ला 29 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान पार पडणार आहे .
श्रीरंग हा कारंजा लाड येथील रहिवासी असून त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके प्राप्त केलेली आहेत. असे असतांना आता अंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करण्याची श्रीरंग ची तीव्र इच्छा आहे, त्याच्या सरावा दरम्यान त्याला त्याच्या वडिलांचे व आईचे मार्गदर्शन लाभते, त्याचा आतापर्यंतच्या कामगिरीमध्ये शासनाकडून वा आमदार खासदाराकडून कुठल्याही प्रकारच्या क्रीडा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत असे वार्ताहारांसोबत बोलत असतांना समजले आहे, सध्यस्तीत सरावासाठी लागणारे मैदान सुद्धा स्वखर्चाणे बनविले आहे , क्लेकटर साहेबांना तसेच जिल्हाक्रीडा अधिकारी तसेच तालुका क्रीडा अधिकारी यांना वेळोवेळी मैदानाच्या व साहित्याच्या मागण्या करण्यात आल्या त्या करूनही त्याकडे कायम दुर्लक्षच करण्यात आले आहे , कितीतरी कौशल्यवाण खेळाडू अजूनही सुविधांपासून वंचित आहेत म्हणून सरावासाठी योग्य मैदान व अत्याधुनिक साहित्य पुरविण्यात आल्यास करंजाचे नावलौकिक जगभरात होईल असे त्याचे मत आहे .

त्याच्या या यशाबद्दल समस्त करंजावासीयांनी त्याला शुभेच्छा दिल्या असून आई वडीलांचा आशिर्वाद घेऊन तो रवाना झाला आहे .

टिप्पण्या