लोहिया यांचा आदर्श ठेवून भविष्यात वाटचाल करावी - न्यायमूर्ती भूषण गवई

लोहिया यांचा आदर्श  ठेवून आपल्या  भविष्यात वाटचाल करावी - न्यायमूर्ती  भूषण गवई 
अकोला:आज दि. २९/०२/२०२० रोजी स्व. ॲड जी. बी. लोहिया यांच्या  प्रतिमा अनावरणाचा कार्यक्रम जिल्हा न्यायालय परिसरात पार पडला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून विद्यमान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय श्री भूषण गवई साहेब उपस्थित होते तर  मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती श्रीमती पी. व्ही. गनेडीवाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय जी खोब्रागडे तसेच जिल्हा सरकारी वकील ॲड गिरीश देशपांडे, अकोला बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड आनंद गोदे व स्व. ॲड जी. बी. लोहिया यांचे सुपुत्र ॲड. अमित जी. लोहिया हे मंचावर उपस्थित होते.  
सर्वप्रथम स्व. ॲड जी. बी. लोहिया ह्यांच्या प्रतिमेचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय श्री भूषण गवई साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.  या प्रसंगी जेष्ठ विधिज्ञ ॲड राजन देशपांडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून स्व. ॲड जी. बी. लोहिया यांच्या कार्य व कर्तृत्वाची आठवण उपस्थित मान्यवरांना करून दिली. यानंतर मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील न्यायमूर्ती श्रीमती पी. व्ही. गनेडीवाला, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री वाय जी खोब्रागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय श्री भूषण गवई साहेब ह्यांनी स्व. ॲड जी. बी. लोहिया यांच्या कार्याचा गौरव करतांना ते वकील म्हणून व एक व्यक्ती म्हणून किती महान होते ह्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी जागवल्या व उपस्थित सर्वांना स्व. ॲड जी. बी. लोहिया यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून आपल्या कर्तव्याची भविष्यात वाटचाल करावी असा संदेश दिला. स्व. ॲड जी. बी. लोहिया यांनी तब्बल ५७ वर्ष अकोला येथे तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय येथे वकिली केली. 
अकोला जिल्हा न्यायालयात झालेल्या या कार्यक्रमास अकोला जिल्हातील सर्व सन्माननीय न्यायाधीश, स्व. ॲड जी. बी. लोहिया ह्यांच्या धर्मपत्नी कौशल्यादेवी गौरीशंकर लोहिया व स्व. ॲड जी. बी. लोहिया यांचे कुटुंबिय यांची विशेष उपस्थिती होती. तसेच अकोला व इतर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ व सन्माननीय विधिज्ञ उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड आनंद गोदे, आभार प्रदर्शन ॲड. अमित जी. लोहिया तर कार्यक्रमाचे संचालन ॲड. अजित पाटखेडकर यांनी केले. 
या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता अकोला बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ॲड. प्रवीण राठी , महिला उपाध्यक्ष ॲड. भारती रुंगठा, वरिष्ठ सचिव ॲड. सुहास राजदेरकर, सहसचिव ॲड. सौरभ शर्मा, सहसचिव ॲड. पियुष देशमुख, ॲड. मोतीसिंग मोहता, ॲड. के. बी. लोहिया, ॲड. अनिल कडू (अमरावती), ॲड. विशाखा तायडे, ॲड. प्रकाश वखरे, ॲड. मोहन मोयल, ॲड. सुभाष काटे, ॲड. एस. जी. खोत व सर्व सन्मानीय विधिज्ञ यांनी परिश्रम घेतले. 

टिप्पण्या