विद्यार्थ्यांनी छत्रपतींचा आदर्श घेण्याची गरज -प्रा. तुकाराम बिरकड

विद्यार्थ्यांनी छत्रपतींचा आदर्श घेण्याची गरज -प्रा. तुकाराम बिरकड
अकोला:आजचा विद्यार्थी हा अनेक वाईट गोष्टींच्या नादी लागून आपले जीवन व आपल्या परिवारातील सर्व लोकांचे स्वप्न मातीत मिसळवीत आहे. जीवनामध्ये उच्च ध्येय ठेवून मोठी स्वप्ने बघून ती पूर्णत्वास नेण्यासाठी लागणारी जिद्द आज विद्यार्थ्यांमध्ये अभावानेच पहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र जो विद्यार्थी आपल्या मनामध्ये साठवतो व त्या प्रमाणे काम करतो, तो विद्यार्थी आपले जीवनातील ध्येय पूर्ण केल्याशिवाय राहत नाही, असे प्रेरक विचार माजी आमदार तुकाराम भाऊ बिरकड यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर मांडले. श्री गणेश कला महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शिवजयंती निमित्तआयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. के.व्ही.मेहरे , तसेच इंग्रजी विभागाचे प्रा.मेघराज गाडगे, कुंभरी गावचे ग्रामपंचायत सदस्य श्री. किशोर भाऊ आखरे व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष तायडे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.मेघराज गाडगे यांनी शिवचरित्र अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने विद्यार्थ्यांसमोर मांडून विद्यार्थ्यांना प्रेरक विचारांनी ओतप्रोत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.प्रसन्न बगडे यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या इतिहास व शारीरिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीत विभागाचे प्रा.सुधाकर मनवर यांनी तर आभारप्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. संजय ढोले ,श्री. सिताराम पवार, श्री. भिमराव तायडे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले...

टिप्पण्या