सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उदघाटन

सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
आजच्या काळात राष्ट्रसंतांचा विचारधारा -रामदास चोरोडे 
अकोला: मानवतेचे महानपूजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचंड प्रचार आणि प्रसार व्हावा या मुख्य उद्देशाने तत्कालीन ज्येष्ठ प्रचारक रामकृष्ण दादा बेलूरकर साहित्यनगरीत तसेच निसर्गवासी विश्वनाथ चिंचोळकर सभागृह मध्ये सातवे राज्यस्तरीय विचार साहित्य संमेलनाची  सुरुवात पहाटे 6 वाजता सामूहिक ध्यान, सकाळी 9.30 वाजता  पालकी मध्ये भारतीय संविधान, ग्रामगीता, अभंगगाथा ,ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथाची दिंडी काढण्यात आली.
सकाळी 11.30 वाजता 7 वे विचारसाहित्य संमेलनाचे उद्धघटक प्राध्यापक डॉ ममता ताई इंगोले , आचार्य वेरुळकर गुरुजी, संमेलनाध्यक्ष माननीय श्री रामदास जी चोरोडे गुरुजी ,स्वागत अध्यक्ष प्रा. ललित जी काळपांडे सर ज्ञानेशवर रक्षक प्रा.डॉ गजानन नारे, रामप्रकाश मिश्रा,प्रा संजय खडसे,डॉ सचिन म्हसने, राष्ट्रसंताच्या भूमिकेत यावलीचे श्री मिरजकर दादा, कृष्णा भाऊ अंधारे, ज्ञानेशवर केसाडे महाराज , माजी राज्यमंत्री श्री गुलाबराव गावंडे , मनोज सिंग बिसेन ,डॉ .सूर्यवंशी,राजेश जयपूरकर व आयोजन समिती चे अध्यक्ष डॉ रामेशवर बरगट व सेवा समितीचे  सदस्य ग्रामगीता विचार पिठावर उपस्तीथि होते.
याप्रसंगी संमेलन गीत विजय वाहोकार, विश्वास कूरवाडे, प्रा. प्रशांत ठाकरे यांनी सुंदर पणे गायन केले.उदघाटन कार्यक्रमा मध्ये राष्ट्रसंताच्या विचाराची काळाची गरज असे संमेलनाध्यक्ष रामदास जी चोरोडे गुरुजी यांनी बीज भाषण मध्ये मत मांडले उदघाटना नंतर या संमेलनाचा पुरस्कार स्व.रामभाऊ जी गाडगे स्मृती प्रित्यर्थ ग्रामगीता जीवन गौरव पुरस्कार श्री ज्ञानेशवर रक्षक ,श्री  ज्ञानेशवर केसाळे महाराज यांना संमेलना अध्यक्ष व स्वागताध्यक्ष  यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.तसेच जे शिक्षक व आयोजक सुसंस्कार उन्हाडी शिबिराचे आयोजन सातत्याने करीत आहे. अशा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे. 
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय निबंध पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले याप्रसंगी प्रा.डॉ राजीव बोरकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ह्या संमेलना मध्ये ग्रंथदिंडी पासून सम्पूर्ण उदघाटनमध्ये आर डी जी कॉलेज ,सुधाकर राव नाईक कॉलेज ,जय बजरंग विद्यालय कुंभारी विध्यार्थी  विद्यार्थिनी उपस्तीत होते सर बबलू तायडे, पीजे राठोड गुरुजी यांचे सहकार्य लाभले आहे प्रस्थाविक डॉ रामेशवर बरगट यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.सचिन महोकार यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ राजीव बोरकर सर यांनी केले
आयोजन समिती 
रामेश्वर बरगट,राजीव बोरकर,श्रीपाद खेडकर,,राजेंद्र झामरे,,ज्ञानेश्वर साकरकर,,सचिन मोहकर,,,उदय मुंडगावकर,गजानन जलमकर, प्रल्हाद निखाडे,शिवा महाले,आकाश हरणे,अनिकेत तायडे,,तुषार बरगट,अनुज भारसाकले,राजेश गावंडे,अतुल डोंगरे,दीपक बोरोकर, राजेश चव्हाण,शुभम वरनकार,कोमल हरणे,मनीषा सूनगारे इत्यादी अनेक सदस्य.

कोणती सावित्री व्हायचंय सत्यवानाची की ज्योतिरावांची?
महिला परिसंवाद १
सहभागी- साक्षी पवार
मोनिका क्षीरसागर
सानिका जुमळे
सत्राच्या अध्यक्षा प्रा ममता इंगोले
संचालन- कोमल हरणे
ज्योतिरावांच्या सावित्रीना दिले झुकते माप!
 सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत विचार साहित्य  संमेलन मध्ये परिसंवाद 1 मध्ये सर्व महिलांनी वक्त्यांनी प्रखर भूमिका मांडल्या. सावित्रीच्या सर्वांगिण मातृभाव ओळखून अभ्यास करणे गरजेचा आहे.असा सूर सुद्धा परिसंवाद मधून निघालेला आहे 
या परिसंवादामध्ये कुमारी साक्षी पवार मोनिका शिरसाठ मोनिका शिरसाट सानिका चुंबळे विद्याताई खडसे यांनी सुंदर परिसंवाद विषयावर आपापली भूमिका स्पस्ट पणे मंडली आहे अध्यक्षीय भाषण मध्ये प्रा ममता इंगोले यांनी समानव्यात्मक भूमिका मांडून सत्यावणासारखा पती आहे का? असा प्रति प्रश्न मांडून आपले अध्यक्षीय भाषणामध्ये आपले विचार मांडले आहेत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु कोमल हरणे यांनी केले

७ वे राज्यस्तरीय विचार साहित्य संम्मेलन ! २०२०
प्रकट मुलाखत-
   मतीन भोसले .
मुलाखत घेणार-
    किशोर बळी .
अतिशय खडतर असे बालपण,
शिकार करण्यासाठी संघर्ष.
भाकर मिळवण्यासाठी खटपट.
ज्वारीची कणसं चोरली म्हणून वडील जेलमध्ये.शाळेत प्रवेश घेतला तेव्हा शक्षकांनी इतर विध्यार्थ्यांना सूचना केल्या की आपापले दप्तर,पुस्तक ,पाटी ,पेन्सिल सांभाडून ठेवा, "चोर" हा शिक्का इंग्रजांनी आमच्या नाशेबी मारलं आणि आपल्या मायबाप सरकारने तो कायम ठेवला कसंबसं शिक्षण घेतलं अप्रशिक्षित शिक्षण म्हणून नोकरी मिळाली पुढे नोकरीत कायम झाली पण दोन घटकांनी प्रचंड अरचस्थ केलं- एक म्हणजे फासे पारधी समाजाची दोन मुलं नाल्याच्या पुरात वाहून गेली
दुसरी म्हणजे मजुरी करणाऱ्या मायबापासोबत मुबई ला गेलेली दोन मुलं दादर स्टेशनवर भीक मागत असताना रेल्वे खाली कटुन मेली तेव्हा ठरवलं की या मुलांना शिक्षकांच्या मुख्य प्रवाहात आणायचं देशाच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे दोनशे विद्यार्थी जमा केली. त्यांच्या आई वडिलांना विश्वासात घेतलं . नोकरी सोडली आणि प्रश्नचिन्ह ,आदिवासी आश्रमशाळा  केली.अनेक आरोप झाले.
२५ केसेस झाल्या , तुरुंगवास झाला. भिकमांगो आंदोलन केलं.आता ४७५ विद्यार्थी ह्या शाळेत शिकतात.अनेक लोक मदत करतात , परंतु कशीबशी बांधलेली इमारत पुन्हा समृद्धी महामार्गामुळे उध्वस्त झाली. आतातरी मायबापा सरकार जाग यावी आणि ह्या मुलांच्या भवितव्यात सुखाचा क्षण येवोत ही अपेक्षा, मतींन  भोसले म्हणालेे.
कवी संमेलन
सूत्र संचालन- ऍड अनंत खेळकर

अध्यक्ष: अरविंद भोडे
विद्याताई बनकर
कविताताई राठोड
गोपाल मापारी
वैभव भिवरकर
नरेंद्र इंगळे
सुरेश पचकवडे
डॉ विनय दांदडे
विशाल कुलट
प्रकाश सरोदे
मंदाकिनी तरडे या कवींचा सहभाग.
पुण्यही माझे विधात्या पाप कर,
पण मला एका मुलीचा बाप कर- गोपाल मापारी

ठेवते माय नैविध्य मुंग्यापुढे
देव दगगळातून वेगळा काढतो- गोपाल मापारी

माणसे मला न भेटली
कट्टरता भेटही गडेहो
बंगले तसेच होते उभे
वस्तीच पेटते गडेहो- वैभव भिवरकर

उंबर्यात बसून उदारू करे 
वास्तवाची सकाळ
उबदा पिकातच वाढून गेला
 आयुष्याचा दुष्काळ- विशाल कुलट

माणसे भेटली अनेक 
पण माणुसकी नाही
भेटली तुमच्या रुपाने
असे वाटते आज  भेटली - प्रकाश सरोदे


पाणी ....! 

         आज ग्लोबल वार्मिंगच्या युगात 
         घोटभर पाणी मिळविण्यासाठी
         पार्थालाही विचार करावा लागेल 
         हजारदा ....
         गांडीव धनुष्याची प्रत्यंचा चढवितांना 
         कारण ; 
         पाणी सार्वजनिक कुठे राहिलंय आता ? - डॉ विनय दादडे

रात्री 8.30 ते 10 बहारदार राष्ट्रीय कीर्तनाचा कार्यक्रम प्रा डॉ भास्कररावजी गुरुजी (नरखेड) यांचे संपन्न झाले या प्रसंगी राष्ट्रसंतांचे राष्ट्रवाद व राष्ट्रीय विचारांची गरज घ्या  विषयावर राष्ट्रीय किर्तन द्वारे प्रबोधन करण्यात आले या प्रसंगी समाज परिवर्तन करिता अनेक उदाहरण देऊन डॉ. विखे गुरुजींनी समाजाचे कार्य करण्याकरिता उपस्थितीताना  प्रबोधन करण्यात आले या प्रसंगी साथ-संगत गजानन जळमकार,  विश्वास कुरवाडे, प्रल्हाद खाडे, प्रा. प्रशांत ठाकरे प्रा. स्वप्नील इंगोले सचिन माहोकार, मुरलीधर निलखन, विजय वाहोकार इत्यादी भजन मंडळांनी  य केले याप्रसंगी शेकडो भाविक उपस्थित होते.
राष्ट्रवंदन  नंतर पहिला दिवस पार पडला

तरुणाई ने गाजवली वक्तृत्व स्पर्धा  
  अकोला :  देशाचं भविष्य घडवणारी युवा पिढी ही मोबाईलच्या क्लीकवर तुटून पडली आहे. या तरुणाईला आजच्या सोशल मीडियाने विळखा घातला आहे,  हा विळखा ओळखून आजच्या तरुणाईने सावध झालं पाहिजे,  तर देशाला महासत्ता बनविण्यासाठी सकारात्मक सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे,  राष्ट्रसंतांचा  विचार या माध्यमातून जगासमोर मांडला पाहिजे, असा विचार वक्तृत्व स्पर्धेतून तरुणाईने रविवारी मांडला.   
                            वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्या वतीने आयोजित सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात वक्तृत्व स्पर्धेने झाली.   
या स्पर्धेत राज्यभरातून पंचवीस स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.  तरुणाईसाठी सोशल मीडिया तारक की मारक, राष्ट्रसंतांचा राष्ट्रधर्म,  माणूस घडवण्यासाठी सुसंस्कार  या विषयांवर तरुण वक्त्यांनी आपल्या वक्तृत्वाने छाप पाडली.  यावेळी परीक्षक म्हणून  प्रा. स्वप्नील इंगोले,  प्रा. प्रशांत ठाकरे यांनी काम पाहिले.  तर या स्पर्धेचे संयोजन  स्वप्नील महोकार यांनी केले.  
या स्पर्धेत प्रथम क्रमांक नाशिकच्या श्रुती बोरस्ते द्वितीय अकोल्याच्या अभय तायडे, तर तृतीय अमरावतीच्या प्रतीक्षा गुरुनुले यांनी बाजी मारली. या विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते पुस्र्कार, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले.  तर उत्तेजनार्थ पुरस्कार अकोल्याची सानिका जुमळे, यवतमाळची काजल टावरी यांना मान्यवरांच्या हस्ते उत्तेजनार्थ  पुरस्कार  देऊन सन्मानित करण्यात आले.   सत्राचे संचालन मयूर वानखडे यांनी केले.  सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

विस्कटलेली घडी बसवण्यासाठी ग्रामगीता हाच उपाय   
                                                   परिसंवादातील सूर                                                                      
अकोला  :   विद्यार्थ्यांना जे शिकवतात ते शिक्षक असतात आणि समाजाला दिशा देण्याचे काम ज्या लोकसंसंतांनी  केले त्या लोकसंतांची शिकवण खऱ्या अर्थाने आज आत्मसात करण्याची गरज आहे, आज दुःखाची परिभाषा बदलली आहे, मुलांवरील संस्कार कमी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे आणि हे चित्र जर बदलायचे असेल तर राष्ट्रसंतांचे विचार प्रत्येक मातेने जोपासणे गरजेचे आहे, एकंदर समाजाचा विचार केला तर समाजात संपूर्ण अराजक्ता पसरली जात आहे त्यामुळेच आजच्या समाजाची  घडी विस्कटलेली दिसत आहे. ही घडी बसवण्याचे काम केवळ राष्ट्रसंतांचे विचारच करू शकतात. त्यासाठी प्रत्येकाने ग्रामगीता आचरणात आणली पाहिजे असा सूर रविवारी परिसंवादातून उमटला.                      वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने आयोजित सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आजच्या समाजाची विस्कटलेली घडी आणि जबाबदारी हा परिसंवाद पार पडला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी  पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विलास आहेर हे होते.   तर प्रमुख वक्ते म्हणून संत साहित्यिक प्रा.डॉ. हरिदास आखरे, सामाजिक व्याख्याते प्रा. हरिदास ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.                       आजचा तरुण हा मोबाईलच्या विळख्यात सापडलेला आहे, आजच्या तरुणाईला खऱ्या अर्थाने सुसंस्कृत करायचे असेल तर त्यांच्या हातात ग्रामगीता दिली पाहिजे. त्यांना संस्कारक्षम करण्याची जबाबदारी ही प्रत्येक मातांची आहे. तरच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल, आणि समाजाची विस्कटलेली घडी बसवण्याचं काम खऱ्या अर्थाने होईल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असलेला माणूस शोधण्यासाठी हे संमेलन मोठी जबाबदारी पार पाडत आहे. असे संमेलन प्रत्येक ठिकाणी घडवून  अन्या ची मोठी जबाबदारी प्रत्येक गुरुदेव सेवा मंडळाने उचलली पाहिजे आणि अशा संमेलनांमधून नच समाजाची विस्कटलेली घडी बसवण्याचे काम सोपे होईल, या विस्कटलेला घडीला आपणच जबाबदार असून याला सुधारण्यासाठी ग्रामगीता अंगात भिनली पाहिजे आणि त्यासाठी असे साहित्य संमेलन झाली पाहिजेत, हा राष्ट्रसंतांचा विचारच हिगडी बसवण्याचे काम करेल असा सूर मान्यवरांनी या परिसंवादातून व्यक्त केला. या सत्राचे बहारदार संचालन धनंजय मिश्रा यांनी तर आभार तुषार बरगट यांनी मानले.

माणूस घडविण्याचे काम संस्कार शिबिरानी केलं    
                                                                      परिसंवादातील सूर                                                अकोला : संस्कार हा माणसाचा महत्त्वाचा दागिना आहे हा दागिना कोणत्याही दुकानात मिळत नाही तर यासाठी संत साहित्याचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. आणि या संस्काराचा दागिना बालमनावर घालण्यासाठी संस्कार शिबिराची महत्त्वाची भूमिका आहे, आजच्या सोशल मीडियाच्या युगात बालमनावर संस्कार करण्याचे काम केवळ संस्कार शिबिरातून होते, माणसाला माणूस बनवण्याचं काम या शिबिरातून होत असल्याचा सूर परिसंवादातून रविवारी उमटला.
 वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने आयोजित सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सर्वांगीन संस्कारक्षम पिढी घडविण्यात शिबिरांचे योगदान हा परिसंवाद पार पडला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गुरुदेव प्रचारक रामदासजी चोरोडे गुरुजी हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. स्वप्नील इंगोले, अक्षय राऊत, डॉ.नरेंद्र तराळे, प्रा. सचिन माहोकार, अखिलेश कांगुळकर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.  
              या परिसंवादात सहभागी वक्त्यांनी मुलांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर तो संस्कार शिबिरात होतो, गुरुदेव सेवा मंडळाच्या संस्कार शिबिरातून  माणूस घडविण्याचे काम होत आहे. सेवा मंडळाच्या या संस्कार शिबिर आणि अनेक वक्ते निर्माण केली, माणसातला माणूस जागा केला, आणि त्यांचे जीवन समृद्ध केले, तर या देशाला संस्कारक्षम पिढी देण्याचं काम संस्कार शिबिरे अविरत करीत आहेत,. राष्ट्रसंतांचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे या प्रेरणेने ओतपोत भरलेलं हे साहित्य संमेलन सुद्धा या संस्कार शिबिराचं देणं आहे. तेजस्वी राष्ट्रनिर्मितीसाठी संस्कारक्षम पिढी घडवायची असेल तर अशा संस्कार शिबिराची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या सत्राचे संचालन मयूर वानखडे यांनी केले.

सकारात्मक दृष्टिकोन सर्वात मोठी ताकद         सचिन बुरघाटे    
                                             आपल्या सभोवताली अनेक बऱ्या वाईट गोष्टी घडत असतात परंतु आपण त्यातील सकारात्मक विचार सातत्याने आपल्या डोक्यात रुजवले पाहिजे, या सकारात्मक गोष्टींचे वारंवार चिंतन केल्याने आपला दृष्टिकोन सकारात्मक होतो. आणि हाच सकारात्मक दृष्टिकोण युवकांसाठी एक प्रेरणादायी ठरू शकतो, असा विश्वास व्याख्याते सचिन बुरघाटे यांनी रविवारी परिसंवादातून व्यक्त केला.                


 वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समितीच्यावतीने आयोजित सातवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी आजच्या युवकांचा वैचारिक दृष्टीकोण हा परिसंवाद पार पडला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अस्पायर चे संचालक सचिन बुरघाटे हे होते.  तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अमोल रावणकर,  ज्येष्ठ व्याख्याते कपिल ढोके व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.     डॉ. अमोल रावणकर यांनी आपल्या भाषणातून ग्रामीण भागातील युवकांची व्यथा व्यक्त केली. युवकांनी आपले विचार सकारात्मक ठेवले पाहिजे,  आपल्यातील आत्मविश्वास जागा केला पाहिजे, आणि सहकार्याच्या भावनेतून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. ध्येयाने प्रेरित झालेल्या युवकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचे ऋण फेडण्याचा काम केलं पाहिजे. आणि हाय दृष्टिकोण निर्माण करण्यासाठी युवकांच्या डोक्यात ग्रामगीता भिनली पाहिजे, आणि हा विचार करण्याचं काम हे संमेलन करीत असल्याचे मत डॉ. अमोल रावणकर यांनी व्यक्त केले.  कपिल ढोके यांनी आपल्या भाषणातून आजच्या युवकांना संस्कारक्षम घडवण्यासाठी ग्रामगीतेचे विचार अमलात आणले पाहिजे असे प्रतिपादन केले. संचालन शुभम बायस्कर व आभार तुषार बरगट यांनी मानले
                                                                           राष्ट्रसंतांचे आरोग्य विषयक विचार    
                                                           या संमेलनात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी मांडलेलाआरोग्यविषयक विचार या विषयावर व्याख्यान पार पडले. महाराजांच्या आरोग्यविषयक विचारावर पहिल्यांदाच या संमेलनात विचार मांडण्यात आला. गुरुकुंज मोझरी च्या श्री गुरुदेव आयुर्वेदिक महाविद्यालयात कार्यरत असलेले डॉ. नंदकिशोर काळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आरोग्य विषयक विचार अभ्यासपूर्ण मांडले. राष्ट्रसंतांनी त्याकाळात स्वतःच्या आरोग्याविषयी विवेचन करताना निरोगी शरीर मानवी जीवनासाठी किती महत्त्वाचे आहे, आणि निरोगी शरीर ही अध्यात्माची कशी सांगड आहे याचे सुंदर विवेचन केले आहे,  असे मत काळे यांनी व्यक्त केले. या सत्राचे अध्यक्ष राष्ट्रसंत निसर्ग निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष  डॉ.रामसिंग राजपूत हे होते. संचालन गोपाल गाडगे यांनी केले

  भजन संमेलनाने आणली रंगत              दोन दिवसीय या विचार साहित्य संमेलनाचे वजन संमेलनाने संमेलनाचीरंगत वाढवली.  राष्ट्रसंतांची अनेक सुंदर भजने आपल्या सुरेल आवाजात गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध  केले.  या भजन संमेलनात विजय वाहोकार, किशोर बंड, प्रल्हादराव निखाडे,  वसंतराव मातडे, मनोहर मानकर, मुरलीधर निलखन , अतुल डोंगरे आदी कलावंतांनी सहभाग नोंदविला.
सामुदायिक प्रार्थनेच्या महत्वावर कोमल हरणे यांनी विचार मांडले.

यांनी घेतले परिश्रम

डॉ रामेश्वर बरगट, प्रा राजीव बोरकर,राजेंद्र झामरे,ज्ञानेश्वर साकारकर,सचिन महोकार,गोपाल गाडगे,डॉ रामेश्वर लोथे,डॉ धर्मापाल चिंचोळकर,डॉ विनय दांडळे, गणेश चोंडेकर,बबलू तायडे,डॉ नरेंद्र तराळे, विजय वाहोकार,गजानन जळमकर, प्रल्हाद निखाडे,देविदास अजानकर,शिवा महाले,दिलीप कराळे, श्रीपाद खेडकर,प्रमोद शेंडे,अतुल डोंगरे,श्रीकृष्ण पखाले,मयूर वानखडे,हृषीकेश हगवणे,कोमल हरणे,मनीषा शिंगारे,प्रतीक्षा शुंगारे,आकाश हरणे,अनिकेत तायडे,सुरज भांगे,तुषार बरगट,अनुज भारसाकळे,नंदकिशोर डबाले,राजेश चव्हाण,राजेश गावंडे,शिवदास गाडेकर,प्रसाद बरगट,मनोज नवंथळे, दीपक बोरोकर,शुभम वरणकर,कुणाल शिंदे


विचार साहित्य संमेलनाला कृतिशील बनवू       - ना. बच्चू कडू   


                                                    अकोला :  देशाला गीतेची नाहीतर ग्रामगीतेचे ची गरज आहे, आजच्या युवकांना ग्रामगीता समजली पाहिजे, राष्ट्रसंतांचे विचार त्यांच्या डोक्यात गेले पाहिजे हे महान कार्य हाती घेऊन हे साहित्य संमेलन अविरत सुरू आहे, लोकवर्गणीतून सुरू असलेले हे विचार साहित्य संमेलन अधिक कृतिशील बनवण्यासाठी मी शासन स्तरावर विशेष प्रयत्न करणार असल्याचे मत जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार बच्चू कडू यांनी रविवारी समारोपीय भाषणात केले. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती द्वारा आयोजित सातवी राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचा समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. सेवा समितीच्या या कार्याला बच्चू कडू यांनी शुभेच्छा दिल्या. या सेवा मंडळाच्या कार्याची स्तुती करीत राष्ट्रसंतांचे विचार अधिक व्यापक करण्यासाठी या  संमेलनाला   अधिक व्यापक करण्यासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.  राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या विचारावरच आपण कार्य करीत असल्याचे ते म्हणाले. आपण मंत्री नसून आपला सेवक असल्याचे उद्गार काढतात काड्यांनी सभागृह कडाडून गेले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामगीता प्रचारक सत्यपाल महाराज, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, संदीपपाल महाराज , संमेलनाध्यक्ष चोरडे गुरुजी, सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर रामेश्वर बरघट, प्रहारचे मनोज पाटील, तुषार फुंडकर, कपिल ढोके प्रामुख्याने उपस्थित होते.      संचालन सचिन मोहोकार यांनी तर आभार गोपाल गाडगे यांनी मानले


टिप्पण्या