अनोखा व्हॅलेंटाईन डे अर्थात पुन्हा जुळले सूर मनाचे

अनोखा  व्हॅलेंटाईन  डे अर्थात पुन्हा जुळले सूर मनाचे 
अकोला:कौटुंबिक न्यायालयाचे वातावरण 14 फेब्रुवारीला फुलून गेले होते. हॉलमध्ये लाल पांढऱ्या रंगाचे फुगे ,सुबक रांगोळ्या ,फुलांची सजावट, आणि उत्साहाने नटून थटून आलेल्या महिला अधिवक्ता, सोबत कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारीवर्ग, कारणही तसेच होते. न्यायालयातील समुपदेशक मनीषा कोपुलवार यांच्या पुढाकाराने अथक प्रयत्नातून आणि कल्पकतेतून साकार झालेली भन्नाट कल्पना म्हणजेच पुन्हा जुळले सूर मनांचे .गेल्या दोन वर्षांपासून ज्या जोडप्यांच्या कौटुंबिक न्यायालयात केसेस सुरू होत्या व ज्या केसेस मध्ये सकारात्मक तडजोड झाली आणि केसेस मधील महिला आपल्या पतीसोबत नांदा वयास गेल्या अशा पन्नास जोडप्यांचा सत्कार करण्याचे ठरविण्यात आले .मनीषा कोपुलवार यांच्या कल्पनेला फॅमिली कोर्टाच्या न्यायाधीश कविता अग्रवाल यांनीदेखील तितक्याच मोलाची साथ देऊन पुन्हा जुळले सुर मनांचे हा कार्यक्रम घडवून आणला .
14 फेब्रुवारीला विविध ठिकाणाहून म्हणजे औरंगाबाद पासून जवळपास 21 दाम्पत्य या या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांच्या मनोगतात त्यांनी कोर्टाच्या समुपदेशक कोपुलवार  आणि  न्यायाधीश अग्रवाल  यांच्या या सकारात्मक प्रयत्नांचा विशेष उल्लेख केला .कार्यक्रमाचे वेळी सहभागी जोडप्याला प्रमाणपत्र आणि जोडप्याचा एकत्रित फोटो देण्यात आला .मला वाटते की दाम्पत्याचा फ्रेम केलेला एकत्रित फोटो देणे ही बाब विशेष महत्त्वाची वाटते. यावरून आयोजकांची कार्यक्रम यशस्वी करण्याची मनापासूनची धडपड लक्षात येत.  न्यायाधीश यांच्या अभिनव संकल्पनेतून प्रत्येक जोडप्याच्या सत्काराचे वेळी गायनाचा लाईव्ह संच रोमँटिक गाण्या च्या चार हो ळी गात होता. मग त्यामध्ये जीवनातील ही घडी अशीच राहू दे ,छु कर मेरे मन को दिया तूने क्या इशारा ,जब कोई बात बिगड जाये जब कोई मुश्किल पड जाये तुम देना मेरा साथ हम नवाज, आदि गाण्यांचा समावेश होता.
 मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून न्यायाधीश शुभदा ठाकरे, महाराष्ट्र राज्य कौटुंबिक समुपदेशक संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ कांबळेे जिल्हा हा विधी प्राधिकरण सचिव न्यायाधीश स्वरूप बोस,अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट आनंद  गोदे ,तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश कविता अग्रवाल ,हे होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोर्टाचे रजिस्टार पी पी देशमुख यांनी केले .तर कार्यक्रमाचे आभार एडवोकेट संगीता भाकरे यांनी मानले .यावेळी अकोला बार असोसिएशनचे पदाधिकारी उपाध्यक्ष भारतीय  रुंगटा एडवोकेट मनीषा धूूत ,एडवोकेट गोठखोडे यांनी विशेष प्रयत्न केले . 
अतिशय पारिवारिक आणि आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला 
14 फेब्रुवारी ही पुलवामा हल्ल्याचीतारीखअसल्याकारणाने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली .

(लेखन: ऍड. मनीषा कुलकर्णी-रत्नाकर)


टिप्पण्या