दहिगाव गावंडे येथील माँ भवानी मंदिर विकास कामाचा शनिवारी शुभारंभ

दहिगाव गावंडे येथील माँ भवानी मंदिर विकास कामाचा शनिवारी शुभारंभ 
अकोला: अकोला पुर्वचे अभ्‍यासू व विकास पर्वासाठी सातत्‍याने नियोजनबध्‍द समतोल विकास केवळ मतांचा विचार न करता सर्वांना न्‍याय देवून सामाजिक दायीत्‍व म्‍हणून कार्यरत अभियंता आ. रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्‍ह्यातील ग्रामिण भागातील आध्‍यात्मिक, धार्मिक व मनाला प्रसन्‍न, शांत ठेवणा-या मॉ. भवानी देवस्‍थान, दहिगांव गावंडे परिसराचा पर्यटन, दळणवळण व ग्रामिण भागात रोजगार तसेच विदर्भातील जागृत देवस्‍थानचा परिचय सर्वदुर व्‍हावा यासाठी २ कोटी रूपयांचा निधी पर्यटन तिर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत कामाचा शुभारंभ व ग्रामिण जनतेला समर्पित कार्यक्रम २९ फेब्रुवारी २०२० शनिवार माघपक्षातील पंचमीच्‍या दिवशी केंद्रीय राज्‍यमंत्री ना. संजयभाऊ धोत्रे यांच्‍या हस्‍ते शुभारंभ होणार आहे. 
अकोला पुर्व विधानसभा मतदार संघात ५ वर्षात वेगवेगळ्या निधी अंतर्गत सामाजिक भौगोलिक विकासासोबत सर्वांसी थेट संपर्क व १८ तास सदैव उपलब्‍ध राहून जनसेवा करणा-या आ. रणधीर सावरकर यांना १ लाखापेक्षा जास्‍त मतदारांनी विश्‍वास व्‍यक्‍त केला. आता पुन्‍हा दुस-या टर्ममध्‍ये आ. सावरकर यांनी विकास पर्वाला गती देण्‍याचे काम सुरू केले असून मतदार संघातील जागृत देवस्‍थान परिसराचा विकास करून भावीक भक्‍तांना सुखसु‍विधा उपलब्‍ध करून देण्‍याच्‍या दृष्‍टीने पाऊले उचललेली आहेत. 
दहिगांव गावंडे पंचक्रोशीमध्‍ये मॉ. भवानी जागृत देवस्‍थान हजारो भक्‍तांचे श्रध्‍दास्‍थान असून या परिसराचा विकास कामाचा शुभारंभ २९ फेब्रुवारी २०२० शनिवार रोजी शेतकरी नेते व सर्वसामान्‍यांचे आधारस्‍थंभ केंद्रीय राज्‍यमंत्री ना. संजयभाऊ धोत्रे यांच्‍या शुभहस्‍ते सकाळी ९ वाजता आ. गोवर्धन शर्मा यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आ. रणधीर सावरकर, महापौर अर्चनाताई मसने, माजी जिल्‍हाध्‍यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्‍यक्ष विजय अग्रवाल, माजी तालुका अध्‍यक्ष अनिल गावंडे, जयंतराव मसने, तालुकाध्‍यक्ष अंबादास उमाळे, दिगंबर गावंडे पाटील आदिंच्‍या उपस्‍थीतीत कार्यक्रम संपन्‍न होणार असून या कार्यक्रमात दहिगांव गावंडे पंचक्रोशीतील नागरीक, शेतकरी, शेतमजूर, ग्रामस्‍थ व मातृशक्‍ती, युवाशक्‍ती मोठ्या संख्‍येने उपस्‍थीत राहवे अशी विनंती दहिगांव गावंडे ग्राम पंचायत व गावक-यांनी केली आहे.

टिप्पण्या