Kasturi: कस्तुरीचा परिमळ पुण्यात दरवळला

कस्तुरीचा परिमळ पुण्यात दरवळला 

प्रा.किशोर बुटोले राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद संस्कार रत्न पुरस्काराने सन्मानित 
पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात मागील १५ वर्षांपासून कार्यरत सेवाभावी सामाजिक संस्था 'संस्कार प्रतिष्ठान'ने स्वामी विवेकानंद जयंती व मा जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून यावर्षीचा राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद संस्कार रत्न पुरस्कारअकोला येथील अग्रणी सेवाभावी सामाजिक संस्था 'कस्तुरी'चे संस्थापक अध्यक्ष प्रा.किशोर बुटोले यांना जाहीर केला. त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील ३७ वर्षाची  सेवा व मागील दशकात कस्तुरी या संस्थेच्या माध्यमातून केलेली सामाजिक सेवेची दखल या पुरस्काराच्या रूपाने संस्कार प्रतिष्ठान ने घेतली.पिंपरी चिंचवड येथील विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळाच्या सभागृहात मराठी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक प्रकाश भागवत , पिंपरी चिंचवड चे माजी महापौर राहुलदादा जाधव , संस्कार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड व अनेक  मान्यवरांचे हस्ते प्रा.किशोर बुटोले यांना पुणेरी पगडी , सन्मानचिन्ह , मानपत्र  देऊन सन्मानित करण्यात आले .या पुरस्काराच्या निमित्ताने कस्तुरी चा परिमळ पुण्यात दरवळला व समाजसेवेच्या कार्याला गती देण्याकरिता संस्कार प्रतिष्ठान ने  नैतिक आधार दिला अशी प्रतिक्रिया प्रा.किशोर बुटोले यांनी दिली.यापूर्वी हे पुरस्कार आशा काळे , मधू कामबीकर, गिरीश ओक , प्रकाश इनामदार , दादा पासलकर , राहुल सोलापूरकर , सोनाली कुळकर्णी , पोपटराव पवार ,अण्णा हजारे , शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे , डॉ प्रकाश आमटे आदी मान्यवराना जाहीर झाले असून अतिशय प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी  प्रा. किशोर बुटोले यांची निवड झाली .या कार्यक्रमात पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते , पुरस्काराकरिता त्यांचे कस्तुरी व मित्रपरिवार ने अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या