कॅल्शियम गोळ्या न खाता करा शेवगा सेवन

कॅल्शियम गोळ्या न खाता करा शेवगा सेवन 
शेवगा लागवड 
शेवगा, सांधेदुखी व कॅल्शियम... आणि भारतीय शेती
9156400521

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला.


एका बाजूला कॅलशियमची कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्यांचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्या गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. तर जनावरांचे कॅलशियम कमी झाल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्याही वाढलेल्या आहेत. दुधाची गुणवत्ता ढासळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जाताना दिसत आहेत. 

आज बाजारात शेतकरी २५ ते ८५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पीक घेणे थांबवतील. मग हाच शेवगा इसराईल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने येईल व तेव्हा तो रांगा लाऊन आपल्याला घ्यावा लागेल. 
महिलांनी त्यांचे सुगरणीचे गूण उपयोगात आणून शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना द्यावे तसेच त्याचे सूप तयार करून द्यावे.
आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. 
शेवग्याची शेंग भाजी, सूप शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.
शेवग्याची चटणी, शेवगा सूप, शेवग्याचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील. 
ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. 
त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत. 
महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी व स्वत:च्या कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे. 
ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची रोज २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचवावी.  स्वत:साठी सुद्धा ते सकस दूध वापरावे व इतरांना देखील तसे सांगून ५ रुपये जादा दराने विकावे. 
शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. 
निसर्ग उपचारात शेवग्याचे फार मोठे महत्व आहे. 
त्यापासून -

▪गाजराच्या १० पट अ जीवनसत्व  मिळते.
▪दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.
▪केळ्यांच्या १५ पट पोट्याशियम मिळते, 
▪पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. 

अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पाडून घेऊ नये व शेतकऱ्यांनी पण हे पीक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून त्याचा विचार करावा. गरज भासल्यास मला विचारावे. त्यासाठी मोफत मार्गदर्शन हवे असल्यास 9767767499संपर्क करावा.9156400512
▪शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजवून घेऊन त्याचा गर काढून तो वाळविता देखील येतो.
▪हे ओर्गानिक कॅल्शियम पचनास चांगले असते. जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्शियम मिळते. मात्र ते सावलीत वाळवून ठेवावे लागते. 

*एक्स्पोर्टचे कारण :* 
पाश्च्यात्य देशात जंक-फूडमुळे हाडांचे विकार वयाच्या १५ व्या पासूनच दिसत आहेत. 
हाडांचे झिजणे, कॅलशिमच्या कमतरता रोखण्यासाठी तेथे शेवग्याचा वापर चालू झाला आहे. 
🌾🎋

ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवुन शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा ही विनंती.आरोग्य संपदा...अनिल गवळी9767767499

🍀🍀शेवगा लागवड 💐💐
9767767499
Pkm2 व ओडिसी शेवग्याच्या खत्री शीर बिया मिळतील.
:शेवगा हे सर्वाच्या परिचयाचं भाजीपाल्याचं झाड आहे. भारतात सगळीकडे शेताच्या बांधावर, परसबागेत याचं अस्तित्व आढळून येतं. शेवग्याचे उगमस्थान भारत असून, त्यात असलेल्या आयुर्वेदिक गुणधर्मामुळे या झाडाचा प्रसार जगातील अनेक देशांत झाला आहे. असे असले तरी त्यांची व्यापारी शेती भारत, श्रीलंका व केनिया या तीनच देशांत केली जाते.याशिवाय पानांची पावडर, बियांची पावडर, बीपासून बेन ऑईल यासारखे प्रक्रिया पदार्थ साध्या पद्धतीने बनविता येत असून, त्याला जगभरातून मोठी मागणी आहे. पानांच्या पावडरचा उपयोग कुपोषण थांबविण्यासाठी पोषक आहार म्हणून वापरतात, तसेच शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात. मोबाईल, घडय़ाळे,टीव्ही इत्यादी दर लिटरला २५ हजार रुपयांनी ते जाते. तसेच वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजतुक करण्यास ८०० ग्रॅम पावडर वापरावी असे सुचित केले आहे.हवामान :शेवग्याची लागवड सर्व हवामानात करता येते. सर्वसाधारणपणे २५ ते ३० डिग्री सें. तापमानात वाढ चांगली होते. तसेच तापमान ४०डिग्री सें. पेक्षा जास्त असल्यास फुलगळ होते.लागवडीसाठी जमीन :शेवग्याची लागवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगरउताराच्या जमिनीत करता येते. चोपण जमिनीत शेवग्याची लागवड करू नये. जमिनीचा सामू ६-७.५ असावा.लागवड :महाराष्ट्र राज्यात दहा-बारा वर्षांपासून शेवग्याची व्यापारी शेती करण्यास सुरुवात झाली असून, ती कमालीची यशस्वी झाली आहे. शेवग्याची लागवड महाराष्ट्रातील सर्व विभागांत करता येते. शेवगा लागवडीसाठी हलकी, मध्यम व भारी यापैकी कोणत्याही प्रकारची जमीन असली तरी चालते; परंतु चांगले उत्पन्न मिळण्यासाठी पाण्याची सुविधा असणे आवश्यक आहे. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत शेवग्याला अजिबात पाणी नसले तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत उत्पन्न खंडित होते. जेथे वर्षभर पाणी आहे अशा ठिकाणी नोव्हेंबर ते जून असे सात ते आठ महिने शेवगा शेंगांचे उत्पन्न मिळते.शेवग्याची लागवड कोकणातील जिल्ह्य़ांत सप्टेंबर ऑक्टोबरपासून फेब्रुवारी-मार्च या कालावधीत करावी. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांत लागवड जूनपासून जानेवारीपर्यंत केव्हाही केली तरी चालते. शेवगा लागवड हलक्या जमिनीत १० बाय १० फूट अंतरावर करावी. एकरी ४३५ झाडे बसतात. मध्यम व भारी जमिनीत १२ बाय ६ अंतरावर लागवड करावी. एकरी ६०० झाडे बसतात.लागवडीसाठी २ बाय २ बाय १.५ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत. ज्यांना खड्डे घेणे शक्य नाही त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल सरी करावी. प्रत्येक प्रत्येक बि लावयच्या ठिकाणी चांगले शेणखत दोन घमेली, जमिनीबरोबर भरावा. आळे तयार करून घ्यावे व एक-दोन चांगला पाऊस झाल्यानंतर प्रत्येक खड्डय़ात एक रोप लावावे.
9767767499
१) बि लावणी नंतर ६ ते ७महिन्यात शेंगा सुरू होतात.
२) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात.
३) या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोन वेळा शेंगा येतात.
४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही.
५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात.
६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
५) पी. के. एम. २ - हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतर पीक शेवगा शेतीत आहे.
१) शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे.
२) भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात हा वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामात ओलीता खाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते११०० शेंगा दर झाडी मिळतात.
३) या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत.
४) सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सें. मि. लांब येतात.
५) लांब शेंगा वजनदार शेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जादा मिळतो.
६) एका झाडाला एकाच हंगामात २१९० शंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला.
७) या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही.
८) बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.
९) सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.थोडक्यात, पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढवणे, जोपासणे योग्य आहे. महत्त्वाचे आहे.या वरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवड ही पी.के.एम. २ ची आहे.
उत्पादन २ वेळ हंगाम व चव आणि लांबी या दृष्टीने पी.के.एम. २ सर्वश्रेष्ठ आहे.

शेवग्याचे छाटनी व्यवस्थापण::
:शेवग्याची छाटणी करण्याचे काम अत्यंत जिकीरीचे असते. शेवग्याची झाडे लागवडीनंतर १.५ते २ महिन्याची झाल्यावर २ ते ३फुट उंचीची असताना शेंड्याची छाटणी करावी. त्यानंतर तो शेंडा पुन्हा जोम धरतोच, त्यामुळे पुन्हा काट करावा. म्हणजे ३ ते ४ फुटी वेगवेळ्या दिशेला निघतील. त्यानंतर मुख्य शेंडा आठवड्यातून २-३ वेळा न चुकता खुडावा आणि बाजूचे चौफेर फुटवे आठवड्यातून १ ते २ वेळा खुडावेत. म्हणजे अनावश्यक वाढ थांबून खोड, फांद्या जाड, झाडे डेरेदार होतील व त्यामध्ये आवश्यक अन्नसाठा तयार होईल.  झाडाचा आकार झत्रीसारखा करावा.पुढे हा अन्नसाठा फुलकळी लागण्यास तसेच शेंगांचे पोषण करण्यास उपयुक्त ठरेल.

शेवग्याचे रोप लागवडीनंतर झाडाची उंची चार फूट झाल्यानंतर तीन फूट झाड ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा. त्यामुळे बगलफूट होईन. येणाऱ्या नवीन फांद्यांवर शेंगांचे उत्पन्न मिळते. जून-जुलैत लागवड केली तर जानेवारी-फेब्रुवारीपासून मेपर्यंत शेंगांचे उत्पन्न मिळते. मेमध्ये हंगाम संपल्यानंतर जूनमध्ये छाटणी घ्यावी. छाटणीसाठी फांदी जेथून फुटली आहे, तेथे चार ते सहा इंच फांदी ठेवून वरील सर्व भाग छाटून टाकावा.किडी व रोग व्यवस्थापन :शेवगा झाडावर कोणताही रोग आढळून येत नाही. मात्र पावसाळ्यात पाने खाणारी अळी व जाळे तयार करणारा कोळी पिकाचे नुकसान करतो. त्याच्या नियंत्रणासाठी  शिवाय महिन्यातून एकदा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.खते :शेवग्याला शेणखत किंवालेंडीखत वर्षांतून एकदाच जूनमध्ये छाटणी झाल्यानंतर द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी निंबोळी पेंड व गांडूळ खताचा अवश्यवापर करावा.काढणी आणि उत्पादन :शेवगा लागवडीनंतर पहिल्या सहा महिन्यांत प्रत्येक झाडापासून सरासरी ३ ते ७ किलो शेंगा मिळतात. दुसऱ्या वर्षी १५ ते २० किलो शेंगा मिळतात व पुढे जसजसे झाडाचे वय वाढत जाते तसतसे उत्पन्नात वाढ होते. जेथे जमीन हलकी आहे व पाणी फेब्रुवारी- मार्चपर्यंतच आहे, अशा ठिकाणी वर्षभरात ३ ते ४ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व खर्च वजा जाता ३० ते ५० हजार रुपये फायदा होतो.जेथे जमीन मध्यम व भारी आहे व वर्षभर पाण्याची सुविधा आहे. अशा ठिकाणी वर्षभरात ५ ते ८ टन शेंगांचे उत्पन्न मिळते व ६० ते ८० हजार रुपयांचा फायदा होतो. शेवगा शेतीचे चांगले व्यवस्थापन करून राज्यातील अनेकशेतकऱ्यांनी बागायत शेतीतून ७० हजार ते १ लाख २५ हजारापर्यंत उत्पन्न मिळवले आहे. शेवगा शेंगांना स्थानिक बाजारपेठांपासूनपुणे व मुंबई बाजारात चांगले दर मिळतात.शेवग्याच्या स्वतंत्र लागवडीबरोबरच आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, आवळा यासारख्या फळझाडांमध्ये आंतrरपीक म्हणून लागवड करणेफायदेशीर आहे. वरील फळझाडांचे उत्पन्न मिळेपर्यंत शेवगा उत्पन्न देतो व फळझाडांचे उत्पन्नसुरू झाल्यानंतर शेवगा झाडे कमी केली तरी चालू शकतात☘☘🍀🍀
Pkm 2.व ओडिसी शेवग्याच्या बिया मिळतील। 2000₹किलो.एक एकर लागवडीसाठी एक किलो बि पुरेसे आहे.9156400512
7385251119
9767767499

गोकुळ देशी सिड बँक
उपलब्ध असलेले देशी- गावरान बियाने-तुमच्या कडील गावरान बियाणे ची मोफत आदला बदली /exchange करु शकता.
 1)spinach-1) पालक-red-root ,white roots
2)fungreek-चुक्का-
3) Has - 
4चाकवत.-artiplex hortensis
5)तांदुळसा/तांदुळजा-chenopodium album
6)coriander  -हल्दी-
7)करडई-कुसुमा-safflower 
8)लालमाठ-लाल माट- Red amranth
9 हिरवामाठ-हरा माट- green amranth
10)लालभाजी-red vegetsble
11)शेपु-  सुवा-Dill
12)आंबाडी,लाल व पाढरी-gongura Red & white
13)कान्दापाती च बि - onion
14)पत्ता कोबि- गोबी-cabbage
15)फुल कोबि- coriflower
16)लवंगी मिरची- तिखा मिर्च-byadagi or spicy chilly
17)बेडगी मिरची-Bedgi chilly
18)जवारी मिरची- jawar chilly
18)ढब्बु मिरची- capsicum 
19)हिरव काटेरी वांग-  हरा काटवाला बैंगन-green Brinjal
20)पाढरं काटेरी वांग- सफेद बैंगन-white Brinjal
21)काळं भरताचं वांग- कला भरते का बैग्ंण-Black Brinjal
22)जांभळ वांग- जमुनी बैग्ंण-purple Brinjal
23)तुप वांग- gheeBrinjal
24)हिरवी लांब काकडी- हरा लांब काकडी- green long cucumber
25)पांढरी काकडी- सफेद काकडी -white cucumber
26)हिरवी काटेरी काकडी-हरा काटें वळा काकडी - green spiny cucumber
27)तर काकडी-लम्म्बा काकडी- long cucumber
28)शेंदाड - foot cucumber
29)वाळूक-bhalluk
30)खरबूज-खरबूज- muskmellon 
31)कलिंगड-  टरबूज-watermelon 
32)पांढर कारल- सफेद करेल्ला-white bitterguard
33)हिरवं कारल-हरा करेला- green bitterguard
34)दोडका- ridge guard
35)गोसावळं-sponge guard
36)कोहाळ/पाढरं कोहाळ- 
36)दुधी भोपळा-दुदी- Bottetgourd
37)काशि भोपळा- कोहला-orange bottelgourd
38)ढेमसं/-टिंन्डा- round melon
39)वरणा/पाढरा पावटा- white peas
40)काळा पावटा- Black pavta
41)लाल पावटा- Red pavta
42)पांढरा मोठा वाल/डफळ-  white big wal
43)लाल मोठा वाल/डबल बी- 
44)गवार/गवारी- cluster beans
45)गोल्टि टोमॅटो-गोल्ती टॉमेटो- tomato
46)काशि टोमॅटो- छोट्टा कासि टॉमेटो-small orange tomato 
47)चेरी टोमॅटो-छोट्टा टॉमेटो- cheery tomato 
48) हिरवी लांब भेंडी- हरा लम्बा भिन्डी- green long - lady's finger
49)हिरवी काटेरी भेंडी- हरा भिन्डीgreenspiny ladyfinger
50)पांढरी  
51)लाल भेंडी- लाल भिन्डी  Red Ladyfinger
52)हिरवा वटाणा- हरा वाटाना  greenpeas
53)काळा वटाणा-कला  - Black peas वाटाना
54)लाख /लाखोळी
55)लाल परसबी- 
56)काळी परसबी
57)पांढरी परसबी
58)लाल घेवडा - लाल वा ल-fabapacae
59)काळा घेवडा- वाल  कला-black fabapace
60)देशी लाल झेंडू-देसी लाल गेदा- red marigold 
61)देशी पिवळा झेंडू-देसी गेदा- yellow marigold 
62)झुडपि चवळी- lobhiya
63)लाल वेलीची चवळी-लाल चौलाई- Red lobhiya
64)एरंड/लहान बि/मोठा- castor big and small seeds
65)जवस - flaxseed
66) लहाण कारळ-
67)पिवळी म्हवरी- पिला राई-yellow musterd
68)काळी लहाण म्हवरी- राई कला-Black small musterd
69)लाल कांन्दा- Red onion
70)गावरान कांन्दा- देसी प्यज-onion
71)पांढरा कांदा- सफेद प्यज-White onion
72)गाजर -गजरा-Carrot
73)बिट-बीट-Beetroot
74)मुळा-मुली-Radish
75)राजगिरा-amranth Red and green
76)बन्सी गहु- Bansi wheat
77)खपली गहु/जोड गहु- wheat
78)काळा कुसळीचा गहु-कला कुस्ली गहू- Blackk spins wheat
79)दगडी ज्वारी- stone jawar
80)गुळभेंडी हुरडा ज्वारी- jawar for rost and eat
81)कुचकुची हुरडा ज्वारी-भुत्ते क्क़ जवर 
82) पिवळी ज्वारी- पिला जव
र-yellow jawar
83)लाल ज्वारी-लाल जवर-Red jawar
84)लाल मका- लाल मक्का-Red maize
85)पांढरी मका जांभळी मका- सफेद मक्का-जमुनी मक्का -White corn/ purple maize
86)गोड मका-मिठा मक्का -sweet corn maize
87)लाह्याची मका- पोप्कोर्न्ंं मक्का-popcorn  maize
88)साठि मका- मक्का- maize 60 days
89)काटाळ हरभरा- काटे का चणा -spiny gram 
90)दाळीचा हरभरा- दाल चना - grains gram
91)हिरवा हरभरा- हरा चना -green gram
92)पांढरा हरभरा- सफेद चणा- white gram
93)पांढरा लहान (चमेली हरभरा) सफेद चणा-white small gram
94)लाल भूईमुग- लाल मूगफळी -groundnut
95)घुंगरू भुईमूग-small groundnut-मूगफळी
96)लाल उडीद- Red gram-लाल उद
97)काळा उडीद- Black gram-कला उदर्द-
98)पिवळा मुग-Yellow vigna radiata-पिला मूग 
99)हिरवा मुग- Green viana radiata-हरा मूग.
100)लाल तिळ -Red benny'-लाल तिल-
101)काळं तिळ- Black benny-कला तीली
102)पाढरं तिळ- white benny-सफेद तिल्ली
103)लाल बोंन्डाची बाजरी- Red jawar-ज्वार-
104)हादगा/हेटा/आगस्ता - agasta
105)शेवगा ODC- Drumstick-सेहजन
106)शेवगा pkm1/pkm2- Drumstick -सेहजन-
107)काळा भात  बि
 108)रक्तसाळी तांदूळ बी  
      ज्या शेतकर्याकडे गावरान देशी वान किंवा बियाने उपलब्ध आहे अश्या{ }शेतकर्यानी- ९७६७७६७४९९  वर सम्पर्क करावा,कारण जर एखाद्या शेतकर्याला जर गरज असेल तरVB bc तुमचा नमब्बर दिला जाईल.                                       आपल्याला देशी वानांचा प्रचार,प्रसार,व वापर  नैसर्गिक/सेंद्रिय/जैविक/आँर्गानिक, शेती मध्ये वाढवायचा आहे.
ज्या शेतकरी बंधुकडे देशी बी/वान/(बियाने)आहे,ते त्याच्या कडील बियांची  मोफत आदला-बदली करू शकतात.ज्यांच्या कडे  बी नाही ते विकत घेउ शकतात.
(***बियाणे हे फक्त देशीच असावे)9156400512
           7385251119
Mo.No- 9767767499

टिप्पण्या