महाराष्ट्र बंद यशस्वी

महाराष्ट्र बंद यशस्वी



बंद म्हणजे कर्फ्यु नव्हे
"एनसीआर सीएए एनपीआर व आर्थिक डबघाई विरोधात बंद म्हणजे कर्फ्यू नव्हे,आम्ही जनतेला कैद केले नाही. महाराष्ट्र बंद यशस्वी. हा मुद्दा जनते पर्यंत पोहचविण्या करीता हा बंद आहे.हिंसाचार किंवा बळजबरी करणे हा आमचा हेतू नाही.तोडफोड होवू न देणे ह्याला प्राथमिकता आहे, जनतेत हा ईश्यू जाणे महत्वाचे. शांततापुर्ण बंद १००% यशस्वी "
ऍड.बाळासाहेब आंबेडकर


भाजप आमदार आणि वंचितच्या कार्यकर्त्यां मध्ये बाचाबाची
अकोल्यात शुक्रवार,24 जानेवारी रोजी बंद दरम्यान भाजप आमदार आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. बंद दरम्यान दुकानं बंद करणारे वंचित बहूजन आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्यात शाब्दीक वाद झाला.आमदार सावरकर हे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता रेल्वे स्टेशन चौकात ही घटना घडली. वंचितचे कार्यकर्ते जबरदस्तीनं दुकानं बंद करीत असल्याचा आरोप आमदार सावरकरांनी केला... यावरूनच आमदार आणि वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. मात्र इतर लोकांच्या मध्यस्थीनं या वादावर पडदा पडलाय. या बाचाबाचीनं स्टेशन चौकात काहीकाळ तणावाचं वातावरण झालं होतं.



वचित आघाडीच्या बंदला अकोल्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
सीएए व देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत वंचित बहुजन आघाडीने आज(शुक्रवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला अकोला शहरामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून सकाळी दहा वाजता उघडणाऱ्या बाजारपेठा अद्यापही बंद होत्या. वंचित आघाडीच्या बंदला अकोल्यात चांगला प्रतिसाद दरम्यान, वंचितचे पदाधिकारी बाजारपेठ बंद करण्यासाठी फिरत होते. तसेच कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी पोलिसही मोठ्या प्रमाणात चौका चौकामध्ये तैनात करण्यात आले होते. मलकापूर चौकामध्ये वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांनी रास्तारोको करून तेथे दुकाने बंद केली. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. वंचित बहुजन आघाडीसाठी अकोला हा गड आहे. त्यामुळे या बंदला वंचितचे सर्व पदाधिकारी यशस्वी करण्यासाठी सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये आणि शहरामध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी बंद यशस्वी करण्यासाठी रास्तारोकोसह मोर्चाही काढला होता.

गौरक्षण रोड ते मलकापूर सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांच्या नेतृत्वात स्वयंस्फूर्तीने शांततेच्या मार्गाने बंद
नगरसेविका किरण ताई बोराखडे महानगराध्यक्ष शंकरराव इंगळे त्यांनी भेटी दिल्या
विशाल गोपनारायण अंकित गोपनारायण राजू गोपनारायण राहुल खंडारे प्रदीप गोप नारायण शेख चांद अजय खंडारे आकाश गोपनारायण भारत वानखेडे विनोद कांबळे अविनाश डोंगरे योगेश अवचार अमित गोपनारायण अभिजीत इंगळे सुरेश खंडारे प्रवीण गोपनारायण निखिल गोपनारायण पवन गोपनारायण शुभम वानखेडे मंगेश शिरसाट राज नारायण सचिन वानखेडे अजय इंगळे सोनू सोनवणे अक्षय मिसाळ सोनू  इंगळे शुभम गोपनारायण उद्धव अंभोरे कमलेश वाहुळकर विषाल खंदारकर सनी गोपनारायण सेवानद इंगळे आशिक पठाण जमीर शेख फारुख पठाण अन्सार भाई राजीक शेख कधीर पठाण शेख चांद शेख अलीम शेख रवी पाटील अरुण बलखंडे आदीसह असंख्य युवक या शांततेत मार्गाने बंदमध्ये सहभागी झाले होते यावेळी खदान पोलिस स्टेशनचे ठाणेदार वानखडे साहेब व पोलीस कर्मचारी संतोष तिवारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता


मुंबईत संमिश्र प्रतिसाद
मुंबईत वंचित आघाडीच्या बंदला संमिश्र प्रतिसाद; उपनगरात बसवर दगडफेक करण्यात आली. घाटकोपरमध्ये 'वंचित'च्या महाराष्ट्र बंदला उस्फूर्त प्रतिसाद तर कुर्ल्यात हिंसक वळण लागले.घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर 'वंचित'कडून रास्तारोकोचा प्रयत्न करण्यात आला.तर अमरावतीत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

वकिलांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन




टिप्पण्या