हरित रत्न पुरस्कार २०१९ ” कुलगुरू डॉ. विलास भाले यांना प्रदान !

कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील प्रतिष्ठित “हरित रत्न पुरस्कार २०१९ ” कुलगुरू डॉ. विलास भाले यांना प्रदान !
आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना (AIASA), नवी दिल्ली या देशपातळीवर कृषि क्षेत्रात कार्यरत संघटनेद्वारे कृषी आणि तत्सम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या विशेषतः युवकाचे सक्षमीकरण कार्यात अग्रेसर कृषी पदवीधर, प्राध्यापक, प्रयोगशील शेतकरी, संस्था आदींना दरवर्षी पुरस्कृत करण्यात येते. यामध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवार्ड, उत्कृष्ट कुलगुरू पुरस्कार, हरित रत्न पुरस्कार, कृषी जीवन ज्योती पुरस्कार, प्रगती पुरस्कार, स्टुडंट ऑफ द इयर अवार्ड, एआयएएसए  सुवर्ण पदक, हरित क्रांती पुरस्कार, हरित पुरस्कार, एआयएएसए यंग सायंटिस्ट अवार्ड, एआयएएसए बेस्ट टीचर अवार्ड, एआयएएसए इन्नोवेषण अवार्ड, इंस्टीट्युटशन ऑफ एक्सलंस अवार्ड, एआयएएसए नँशनल अवार्ड फॉर आऊट स्टँडिंग लीडरशिप इन अँग्रीकल्चर आदी पुरस्कारांचा समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना (AIASA), नवी दिल्ली” या कृषी पदवीधरांचे संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीमध्ये जेष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन, लोकसभा सदस्य श्री. जगदंबिका पाल,  भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तथा भारतीय वन संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. एस. सी. गैरोला, केंद्रीय कृषी विद्यापीठ, इम्फाळचे भूतपूर्व कुलपती डॉ.आर. बी. सिंग, आणि आखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे सचिव डॉ. आर. पी. सिंग पँट्रोन असून महाराष्ट्रासह देशातील सर्वच कृषी विद्यापीठातील पदवीधर सदस्य आहेत.
आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना (AIASA), नवी दिल्लीद्वारे ” सन २०१९ च्या  “हरितरत्न” पुरस्कारासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांची निवड करण्यात आली. कृषी शिक्षण, संशोधन तथा प्रशासनिक कार्यातील  गत १५ वर्षातील उल्लेखनीय कार्याचे विशेषतः युवा वर्गाचे सबलीकरणासाठी केलेल्या अत्युच्च कामगिरी बद्द्दल देशभरातील सर्व कुलगुरू व इतर कृषी पदवीधरांमधून डॉ. भाले यांची निवड राष्ट्रीय समितीने केली आहे. या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत, भारतीय कृषी सेवा परीक्षा, राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेत. विविध स्पर्धा परीक्षांत उल्लेखनीय यश संपादन केले असून विद्यापीठाद्वारे कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमातून ग्रामीण युवा उद्योजक घडविण्यात आले आहेत. या उपलब्धींचा या पुरस्कारासाठी सहयोग प्राप्त झाला असून केवळ विदर्भाच्याच नव्हे तर महाराष्ट्र राज्यासाठी हि गौरवाची बाब आहे.  
इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय, रायपुर, आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना (AIASA), नवी दिल्ली आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय, रायपुर येथील स्वामी विवेकानंद सभागृहात दिनांक 20  जानेवारी रोजी आयोजित  “भावी पिढी साठी नाविन्यपूर्ण कृषी उपक्रम-  कृषी आणि तत्सम क्षेत्रांतील शाश्वत मनुष्यबळ निर्मितीमधील संधी आणि आवाहने ” या विषयावरील 5व्या राष्ट्रीय युवा परिषदेत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपमहानिदेशक डॉ. आर. सी. अग्रवाल याचे शुभहस्ते डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना सन २०१९ चा “हरितरत्न” पुरस्कार सन्मानचिन्ह, मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय, रायपुरचे कुलगुरू डॉ. कर्नल. एस. के. पाटील, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकेचे व्यावसायिक महाव्यवस्थापक श्री. एम. सोरेन, आखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे सचिव डॉ. आर. पी. सिंग, आसाम कृषी विश्वविद्यालय, जोरहटचे माजी कुलगुरू डॉ. व्ही.एस. बघेल, अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. एन.सी. पटेल यांचे सह  आखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना (AIASA), नवी दिल्लीचे सचिव डॉ. सहदेव सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना सन २०१९ चा “हरितरत्न” पुरस्कार मिळाल्याने विद्यापीठाच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेल्याची भावना असून विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य, सर्व संचालक, शास्त्रज्ञ, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तथा विद्यार्थी वर्गाने डॉ. भाले यांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे मार्गदर्शनात यापूर्वी याच विद्यापीठाच्या डॉ. पंजाबराव देशमुख कॉम्पेटेटिव्ह फोरम ला देशातील सर्वोत्तम सेंटर फॉर एक्सलंस अवार्ड देऊन गौरविण्यात आले होते हे देखील या ठिकाणी उल्लेखनीय आहे.

टिप्पण्या