भाऊसाहेब देशमुख जयंतीउत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"-सचिन बुरघाटे

 डॉ भाऊसाहेब देशमुखांचे कार्य शिक्षण व लोककल्याणचे -प्रा.यशवंत पाटणे

डॉ.भाऊसाहेब देशमुख जयंतीउत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची रेलचेल


स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात भाऊसाहेब देशमुख ह्यांचा 121 वा जयंतीउत्सव 15 ते 18 जानेवारी 2020 अशा चारदिवस आयोजित केला आहे. जयंतीउत्सवाच्या पहिल्या दिवशी भाऊसाहेब जयंतीउत्सवामध्ये सामाजिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम रेलचेल पाहायला मिळाली. अस्पायर दि इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंट चे संचालक व आंतरराष्ट्रीय मोटीवेशनल स्पीकर सचिन बुरघाटे यांचे व्याख्यान झाले. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार', असा सचिन बुरघाटेच्या व्याख्यानाचा मुख्य विषय होता. कालचे तुम्ही आणि आजचे तुम्ही यातील फरक म्हणजे सुधारणा (Improvement). असा मौलिक विचार मा.सचिन बुरघाटे यांनी दिला.  विश्व मोठे आहे त्यामुळे स्वतःला ओळखा इतरामध्ये जे आहे, ते तुमच्यामध्ये नाही. प्रत्येकामध्ये विशेष असते त्यामुळे स्वतःला ओळखा असे मत सचिन बुरघाटे  यांनी दिले. दुसऱ्या सत्रामध्ये  "आपण व्हावे त्यांचे समान" ह्या विषयावर सातारा येथील डॉ यशवंत पाटणे यांचे संस्कारक्षम व्याख्यान आयोजित केले होते.  दुसऱ्या सत्राच्या व्याखानामध्ये सातारा येथील डॉ यशवन्त पाटणे यांचे व्याख्यान पार पडले.
महापुरुषांची जयंती हा विचार चैतन्याचा सोहळा असतो . जेव्हा समाजजीवनाचा तोल जातो , नीतितत्लाचा - हास होतो , माणसाला नेमका धर्म समजत नाही तेव्हा मानवोची गीता सांगण्यासाठी शिक्षण महर्षी डॉ . पंजाबराव देशमुख यांच्यासारखे महापुरुष जन्माला येतात , ते वेदनेचे वाटेने जात मानवी जीवनात आत्मचैतन्य निर्माण करतात . सध्या वाढत्या धर्मद्वषामुळे समाजजीवन दुभंगत चालले आहे , मूल्ये पापदळी तुडविली जाताहेत , अतिरेकी चंगळवाचमुळे जीवन सौंदर्याची आणि संस्कृतीची हानी हत आहे . अशाकाळात समाजाला दीपस्तभाप्रमाणे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य भाऊसाहेबांच्या जीवनचन्त्रिात दिसते . भाऊसाहेबांनी गांधीची निर्भयता , साधव आणि साधेपण स्वकारुन लोकशाही मूल्यांसाठी संघर्ष केला . शेती आणि शिक्षण क्षेत्रात मानवतेच्या मुद्रा उमटविल्या , निष्णात वकील आणि निष्ठावंत समाजसेवक या नात्यने शेतकरी , कष्टकरी , उपेक्षित समाजाला न्याय दिला . समाजाच्या दुख , दारिदय चे मूळ अज्ञानात असते , शिक्षण हेच मानवाच्या प्रगतीचे आणि समाजाच्या परिवर्तनाचे प्रवेशद्वर असते , हे ओळखून शिवाजी शिक्षण संस्थेची उभारणी केली गरिबीवर मात करून मुले ज्ञान्धीमंत , सुसंस्कृत आणि स्वावलंबी कावीत , हा त्यांचा ध्यास होता . त्यांचे जीवन हे लोकल्यागाचे ध्यासपर्व आहे . . . विवेकानंद , गाडगेबाबा , तुकडोजी महाराजांचे संतत्व त्यांनी शिष्ठेने जपले . कर्म सेवामय झाले की जीवन सार्थकी लागते . याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला . भारताच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येकाने भाऊसाहेबांच्या जीवा कार्याचा आदर्श जपला पाहिजे असे मत डॉ यशवंत पाटणे यांनी व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात खुली प्रश्नमंजूषा आयोजित केली होती प्रश्नमंजूषेचे संयोजन प्रा. नितीन मोहोड व प्रा.कपिला म्हैसेने ह्यांनी केले. स्पर्धात्मक परीक्षांच्या दृष्टीने ही स्पर्धा रंगतदार झाली व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. आज अर्थशास्त्र विभाग व नितीन पावणे करन्सीज यांच्या संयुक्त विद्यमाने 'चलन प्रदर्शनी आयोजित केली होती, यामध्ये दुर्मिळ व देशविदेशातील नाण्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.  
आजच्या कार्यक्रम चे अध्यक्ष माननीय एडवोकेट श्री गजानन राव पुंडकर तर उद्घाटक आणि प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य यशवंत पाटणे यांची उपस्थिती होती प्रमुख उपस्थितीमध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा. श्री केशवराज मेतकर मा.डॉ डॉक्टर विठ्ठल वाघ मा. डॉक्टर एकनाथराव उपाध्य माननीय श्री प्रशांत देशमुख मा. प्राध्यापक राजाभाऊ देशमुख माननीय प्राध्यापक सुरेश मा. श्री शेषरावजी काळे तसेच प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे  सांस्कृतिक कार्यक्रम समिती समन्वयक डॉक्टर डॉ.समीर कडू यांची  उपस्थिती होती.   प्रमुख उपस्थिती मध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय अमरावती येथील माननीय श्री एस धुमाळे  तसेच डॉ.  सतीश पुनसे  डॉ. संजय खडक्कार माननीय डॉक्टर किरण खंडारेमाननीय डॉक्टर ज्योती मानकर माननीय श्री अशोक चंदन यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय राऊत तर आभार प्रदर्शन अंकुश इंगळे दुसऱ्या सत्राचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी देवर तर आभार प्रदर्शन कु.दिपाली दांदळे ह्या विद्यार्थ्यांनी पार पाडले.

टिप्पण्या