drought-situation-in-akola-akot: अकोला तालुका व अकोट तालुक्यातील दुष्काळ संदर्भात आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : अकोला तालुका व अकोट तालुक्यातील दुष्काळ, आगामी उन्हाळ्यातील पाणी टंचाई, तलावातील गाळ काढणे आणि नाला खोलीकरण या विषयावर आज तहसील कार्यालय, अकोला येथे आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली.


आगामी उन्हाळा लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश यावेळी आमदार सावरकर यांनी दिले. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये, तसेच गुराढोरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था, विकास, सामाजिक समस्या आणि सामाजिक एकता या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाली.


सध्या ओला दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन आमदार सावरकर गेल्या तीन महिन्यांपासून सक्रिय असून राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ते सतत पाठपुरावा करत आहेत. प्रशासनाच्या माध्यमातून प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी संवाद साधून त्याची मंजुरी व अंमलबजावणी कशी होईल यावर भर दिला जात आहे.


ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागाची जबाबदारी सांभाळत, अकोला महानगराचे प्रतिनिधित्व करत ग्रामीण भागाचा खरा चेहरा म्हणून आमदार सावरकर कार्यरत आहेत. आज सकाळी मुंबईहून विमानाने विशेष अकोल्यात येऊन दुपारी २ वाजता पोहोचताच, ४ वाजता त्यांनी तातडीने अकोट व अकोला तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या व अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ही बैठक घेतली.


बैठकीस उपस्थित मान्यवर  उपजिल्हाधिकारी विजय पाटील, एसडीओ जावळे, तहसीलदार झाल्टे, अकोट तहसीलदार सुनील चव्हाण, एसडीओ लोणारकर साहेब, बीडीओ पटोकार, कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील, राठोड , मस्कर , सोळंके , मालोकार , निखिल राऊत, कांचन उमाळे, पवन घोडस्कर, विपीन सपकाळ, नाम फाउंडेशनचे शेळके , अकोट बीडीओ रमाकांत माळी, संजय बर्डे, कृषी विभागाचे प्रवीण भोर, राजेश नागमते, राजेश बेले, विजयसिंह सोळंके, विनोद मंगळे, महेंद्र काळे, प्रवीण हगवणे, अंबादास उमाळे, विवेक भरणे, पंकज वाडीवाले, जयकुमार ठोकळ, मनोज देशमुख, राजू ठाकरे, किशोर काकडे, प्रवीण डिक्कर, शिवशंकर डिक्कर, आशिष देशमुख, संजय कोरडे, अतुल आवारे, विठ्ठल चतरकर आदी अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अधिकाऱ्यांनी केलेले प्रस्ताव 


राज्य शासनाकडे असलेले प्रलंबित काम आणि शासनाची सकारात्मक भूमिका यावर चर्चा झाली. मानवता आणि कर्तव्य या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आणि आमदार रणधीर सावरकर यांची सक्रियता याचा प्रत्यय पुन्हा एकदा अकोला जिल्ह्याला आला आहे. अकोला पूर्व मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तसेच अकोला महानगरपालिकेत दिलेली जबाबदारी पूर्ण करत ग्रामीण भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्यांच्या अडचणीही आमदार सावरकर यांनी समजून घेतल्या.

टिप्पण्या