akola-crime-news-old-city-mh: विवाहाचे आमिष दाखवून महिलेचे शोषण केल्याचा आरोप; आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल, आरोपी फरार!
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | भारतीय अलंकार न्यूज 24
विवाहाचे आश्वासन देऊन महिलेचा विश्वास संपादन करत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर विवाहास नकार दिल्याचा तसेच धमकी दिल्याचा आरोप अकोल्यातील कपिल जनार्दनपंत नायसे (वय ४५, रा. जुने शहर, अकोला) याच्याविरुद्ध करण्यात आला आहे. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ६९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती असून, त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
ओळखीतून जवळीक; विवाहाचे आश्वासन दिल्याचा आरोप
FIR मधील तक्रारीनुसार, संबंधित महिला आणि आरोपी यांच्यात एका मैत्रिणीच्या मार्फत ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर आरोपीने विवाह करण्याचे आश्वासन देऊन महिलेचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे. विवाहाचे आश्वासन देत पिडीतेशी तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करुन लग्नास विविध कारणे सांगून टाळाटाळ करीत राहिला. व पीडीतेस काहीही न सांगता दुसरीकडे लग्न जमवून साखरपुडा करून फसवणूक केली. लग्न जमलेल्या मुलीच्या घरच्यांना ही माहिती मिळाल्याने त्याने लग्न मोडले. व लग्न मोडल्याचा राग मनात धरुन, आरोपीने पिडीतेस जीवन यात्रा संपविण्याचा आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या दिल्या. यानंतर पीडित महिलेने जुने शहर पोलिस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली.
कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणाचाही संदर्भ
तक्रारीमध्ये संबंधित महिलेच्या वैवाहिक परिस्थितीचा आणि कौटुंबिक न्यायालयातील यापूर्वीच्या न्यायालयीन प्रक्रियेचा संदर्भ देण्यात आला आहे. आरोपीने विवाहाचे आश्वासन देऊन आपला विश्वास संपादन केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९२९/२०२६ अन्वये २४ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
लागू करण्यात आलेली कलमे :
- भारतीय न्याय संहिता कलम ६९
- भारतीय न्याय संहिता कलम ३५१(२)
आरोपी फरार; पोलिसांकडून शोध घेण्याचे आव्हान
या प्रकरणातील आरोपी कपिल जनार्दनपंत नायसे फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. FIR नुसार, या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गीता तांदगे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आता पोलीस तपासात काय निष्पन्न होते आणि आरोपीचा शोध कधी लागतो, याकडे लक्ष लागले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा