bail-granted-akola-crime-news: POCSO प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर; ॲड. प्रफुल सुरवाडे यांचा प्रभावी युक्तिवाद
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : उरळ पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याच्या आरोपावरून उरळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या POCSO प्रकरणातील आरोपी अजिंक्य बाबुराव वानखडे याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी मंजूर केला आहे. आरोपीतर्फे ॲडव्होकेट प्रफुल सुरवाडे यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला.
ॲड. सुरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी टाकळी नीमकर्दा येथील एका अल्पवयीन मुलीची छेडखानी केल्याच्या आरोपावरून अजिंक्य बाबुराव वानखडे याच्याविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गुन्हा क्रमांक २९५/२०२६ अंतर्गत BNS कलम ७८, ७९ तसेच POCSO कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर १३ ऑगस्ट २०२६ पासून आरोपी न्यायालयीन कोठडीत होता. त्यानंतर आरोपीतर्फे जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला.
सदर जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान आरोपीतर्फे ॲड. प्रफुल सुरवाडे यांनी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. नकुल जोशी, ॲड. रूपाली रणसिंग आणि पुरुषोत्तम कावरखे यांनी सहकार्य केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने ४ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करून त्याची तुरुंगातून सुटका करण्याचा आदेश दिला.
ठळक मुद्दे
१३ ऑगस्ट रोजी उरल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
BNS कलम ७८, ७९ व POCSO कलम ८, १२ अंतर्गत कारवाई
१३ ऑगस्टपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत
आरोपीतर्फे ॲड. प्रफुल सुरवाडे यांचा युक्तिवाद
४ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर
तुरुंगातून सुटकेचा आदेश जारी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा