- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
world-photography-day-akola: छायाचित्रकारांचा महामेळावा! जागतिक छायाचित्र दिनी अकोला नगरीत 'कॅमेरा दिंडी'चा जल्लोष
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने शहरातून पारंपरिक उत्साहात भव्य 'कॅमेरा दिंडी' काढण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ अकोला जिल्ह्यात राबवला जाणारा हा अनोखा उपक्रम यावर्षीही छायाचित्रकारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात दिमाखात पार पडला.
दिंडीचा प्रारंभ सकाळी ऐतिहासिक श्री राजेश्वर मंदिर येथून झाला. प्रारंभी श्री राजेश्वराचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर फुलांनी सजवलेल्या कॅमेऱ्याचे ज्येष्ठ छायाचित्रकारांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजन करून दिंडीला सुरुवात झाली.
पदाधिकारी व सदस्यांची प्रमुख उपस्थिती
पारंपरिक वेशभूषेत निघालेल्या या दिंडीत अकोला-बुलढाणा जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र नायसे, उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख, सचिव नितीन देशमुख, सहसचिव उमेश चाळसे यांच्यासह योगेश उन्होने, महेश इंगळे, हर्षल गढेकर, राहुल ताडे, विशाल खंडारे, अजय जागीरदार, सारंग वझे, राम शर्मा, संदीप शाहू, पंकज पराते, राज पिंपळे, संजय सरकटे, अवि तायडे, प्रवीण आंबिलकर, विक्की कलमकार, अनिरुद्ध तराळे, दिनेश पिल्ले, विशाल मानतकर यांच्यासह जिल्ह्यातील छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिंडी मार्ग व समापन
श्री राजेश्वर मंदिरापासून निघालेली ही कॅमेरा दिंडी जयहिंद चौक, मोठा पूल, शहर कोतवाली, गांधी रोड आणि मनपा चौक मार्गे स्वराज्य भवन परिसरात पोहोचली, जिथे दिंडीचा उत्साहात समारोप करण्यात आला.
या उपक्रमासाठी सहयोग लॅब, सिद्धिविनायक लॅमिनेशन (पंकज पराते), गणेश इलेक्ट्रॉनिक्स आणि सायरा सेल्स यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जयहिंद चौक व मनपा चौक येथे गणेश इलेक्ट्रॉनिक्स आणि रितेश मालगे यांच्या वतीने सहभागी छायाचित्रकारांसाठी चहापानाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
अकोला
कॅमेरा दिंडी
छायाचित्र दिन
बुलढाणा
Akola
buldhana
Camera Dindi
Photographers
rajeshwar mandir
World Photography Day
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा