raksha-bandhan-2026-festival: रक्षाबंधन २८ ऑगस्टलाच; अकोला पुरोहित संघाने दूर केला संभ्रम

पौर्णिमा दोन दिवस असली तरी सणाची तारीख निश्चित; २८ ऑगस्टला दिवसभर शुभ मुहूर्त



BhartiyaAlankarNews24

भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : यंदा पौर्णिमा तिथी २७ आणि २८ ऑगस्ट अशा दोन दिवसांमध्ये येत असल्याने रक्षाबंधन नेमके कोणत्या दिवशी साजरे करायचे, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा संभ्रम दूर करण्यासाठी अकोला पुरोहित संघातर्फे श्री बालाजी मंदिरात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत विविध पंचांग आणि धर्मग्रंथांचा आधार घेत रक्षाबंधनाच्या तारखेबाबत स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आला.


२८ ऑगस्टलाच रक्षाबंधन साजरे करा


अकोला पुरोहित संघाने स्पष्ट केले की, रक्षाबंधन शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजीच साजरे केले जाणार आहे. शास्त्रात कोणताही संभ्रम नसतो, तर शास्त्र स्पष्ट असते, अशी भूमिका पुरोहित संघाने मांडली.


धर्मग्रंथांच्या नियमानुसार भद्रारहित पौर्णिमा तिथी २ तास २४ मिनिटांपेक्षा अधिक असल्यास सूर्योदयाच्या वेळी असलेली पौर्णिमा तिथी ग्राह्य धरून त्याच दिवशी सण साजरा करण्याचा निर्देश असल्याचे पुरोहित संघाने सांगितले.


रक्षाबंधनाचे महत्त्वाचे मुहूर्त


सुण मांडणे :

गुरुवार, २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०८ वाजण्यापूर्वी सुण मांडता येईल.


सुण जेवण :

शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी दिवसभर शुभ राहणार आहे.


राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त :

अपरान्ह काळाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे.


- चर : सकाळी ०६:०६ ते ०७:४०

- लाभ : सकाळी ०७:४० ते ०९:१५

- अमृत : सकाळी ०९:१५ ते १०:४९

- अभिजीत : दुपारी १२:०० ते १२:४८

- शुभ : दुपारी १२:२३ ते ०१:५७


पुरोहित संघाच्या माहितीनुसार पौर्णिमा तिथी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ०९:४७ वाजेपर्यंत राहणार आहे. पंचक लागलेले असले तरी त्यामुळे रक्षाबंधन सणाला कोणताही दोष लागत नसल्याचेही संघाने स्पष्ट केले.


अनेक पंचांगांच्या आधारे निर्णय


रक्षाबंधनाच्या तारखेबाबतचा हा निर्णय धर्मसिंधू, निर्णयसिंधू, महाराष्ट्रीयन सम्राट, वल्लभ, मनीराम आणि निर्णय सागर आदी पंचांगांच्या आधारे घेण्यात आल्याचे पुरोहित संघाने प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.


सभेला पुरोहितांची उपस्थिती


श्री बालाजी मंदिरात झालेल्या या सभेला पं. प्रमोद तिवारी, लाला तिवारी, भैरव शर्मा, श्याम सुंदर अवस्थी, मुरारी लाल जी पुजारी, रवि कुमार शर्मा यांच्यासह अन्य पुरोहित उपस्थित होते.


ठळक मुद्दे


रक्षाबंधन : शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६

२७ आणि २८ ऑगस्टला पौर्णिमा तिथी असल्याने संभ्रम दूर

२८ ऑगस्ट रोजी सुण जेवणासाठी दिवसभर शुभ वेळ

राखी बांधण्यासाठी अमृत, शुभ, अभिजीत आदी मुहूर्त उपलब्ध

पौर्णिमा तिथी सकाळी ९:४७ पर्यंत

पंचकामुळे रक्षाबंधनाला कोणताही दोष नाही

विविध पंचांगांच्या आधारे अकोला पुरोहित संघाचा निर्णय

टिप्पण्या