court-verdict-legal-updates-akl: आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आरोपी निर्दोष मुक्त; पुराव्याअभावी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय

ॲड. शेख शाकिर आणि ॲड. मो. इकबाल सिद्दीकी यांचा प्रभावी युक्तिवाद





भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: चारित्र्यावर संशय घेत एका महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून आरोपी मंगल तेलमोरे यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.


जिल्हा व सत्र न्यायाधीश (दुसरे) यांनी सत्र खटला क्रमांक १९९/२०२४ मध्ये आज दिनांक ०४ ऑगस्ट २०२६ रोजी महत्त्वपूर्ण निकाल देत पुराव्याअभावी आणि साक्षीदारांच्या पुराव्यामध्ये तफावत असल्यामुळे आरोपी मंगल तेलमोरे यांची भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ आणि ४९८-अ मधून पूर्णपणे निर्दोष सुटका केली आहे. 


या प्रकरणी फिर्यादीने खदान पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. आरोपी मंगल तेलमोरे याने फिर्यादीच्या मुलीवर चारित्र्यावर संशय घेतला होता, म्हणून तिने रेल्वेखाली येवून जीवन संपविले, असा आरोप पोलीस तक्रार मध्ये केला होता.



या खटल्यामध्ये आरोपीच्या बाजूने ॲड. शेख शाकिर आणि ॲड. मो. इकबाल सिद्दीकी यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद करत बाजू मांडली, तर त्यांना ॲड. मो. सिराज खान, ॲड. शोएब इनामदार आणि ॲड. गौरव निखाडे यांनी कायदेशीर सहकार्य केले.


टिप्पण्या