- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
pme-bus-service-smart-city-: अकोल्यात १५ ऑगस्टपासून धावणार ४२ अत्याधुनिक ई-बस; पुरवठादार कंपनीसोबत करार पूर्ण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेअंतर्गत अकोला शहराला १४ मोठ्या व २८ मध्यम क्षमतेच्या वातानुकूलित बस; चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि. ३ जुलै :
अकोला शहरातील नागरिकांना अत्यल्प दरात आधुनिक, वातानुकूलित, सुरक्षित आणि सर्व सुविधांनी सुसज्ज सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. प्रधानमंत्री यांच्या महत्त्वाकांक्षी केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई-बस सेवा योजनेअंतर्गत अकोला महानगरपालिकेस मिळणाऱ्या ई-बससाठी पुरवठादार कंपनीसोबतचा द्विपक्षीय करार शुक्रवारी पूर्ण करण्यात आला.
खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर आणि पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून अकोला शहरासाठी एकूण ४२ ई-बस मंजूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये १२ मीटर लांबीच्या १४ बस आणि ९ मीटर लांबीच्या २८ बसांचा समावेश आहे.
आज दि. ३ जुलै रोजी बस पुरवठा करणाऱ्या नेक्स्टजेन ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, फरीदाबाद या कंपनीसोबत महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या माध्यमातून अधिकृत करार करण्यात आला. यावेळी महापौर शारदा खेडकर, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, उपमहापौर अमोल गोगे, भाजपा महानगर अध्यक्ष जयंत मसने, सभागृहनेता पवन महल्ले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी यावेळी सांगितले की, ई-बससाठी आवश्यक चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले असून करार पूर्ण झाल्यानंतर एका महिन्याच्या आत कंपनीकडून बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच येत्या १५ ऑगस्टपासून अकोला शहरात ई-बस सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला शहर अभियंता अजय गुजर, परिवहन सेवा विभागाचे नोडल अधिकारी अमोल डोईफोडे, कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर निशांत शहा, डेपो मॅनेजर जय देसाई यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ठळक मुद्दे
• अकोला शहरासाठी एकूण ४२ ई-बस मंजूर
• १२ मीटरच्या १४ आणि ९ मीटरच्या २८ बसचा समावेश
• नेक्स्टजेन ग्रीन मोबिलिटी कंपनीसोबत करार पूर्ण
• चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात
• एका महिन्यात बस उपलब्ध होणार
• १५ ऑगस्टपासून ई-बस सेवा सुरू करण्याचा मानस
• नागरिकांना कमी दरात वातानुकूलित आणि सुरक्षित प्रवास सुविधा
Akola
Akola Municipal Corporation
Akola News
ElectricBus
EVBus
Green Mobility
Maharashtra
PMEBusService
Public Transport
Smart City
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा